इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा भारताऐवजी युएईमध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 19 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे पहिला सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ स्पर्धेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळणार आहे. आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने या स्पर्धेत खेळण्याच्या मानसिकतेविषयी सांगितले.
तो हिंदुस्थान टाइम्स या वृत्त वाहिनीशी बोलत होता. तो म्हणाला, “बायो बबलमध्ये राहणे एक आव्हान आहे. येथे आपल्याला आपल्या स्वत:च्या सानिध्यात रहावे लागते. स्वत:ला तंदुरुस्त आणि प्रेरित ठेवावे लागते.”
टीव्हीवर बिग बॉस हा कार्यक्रम प्रसारित केला जातो जिथे स्पर्धकांना बरेच दिवस एकाच घरात राहावे लागते. या कार्यक्रमाशी तुलना करताना धवन म्हणाला, “ बायो बबलमध्ये राहून आपण बिग बॉस प्रमाणेच आपली मानसिक शक्ती तपासू शकतो. प्रत्येकासाठी हे अगदी नवीन आहे. मी चांगला होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी स्वतःचे मनोरंजन करीत आहे आणि गोष्टी सकारात्मक मार्गाने घेत आहे. एखादी व्यक्ती स्वतःशी कशी संवाद साधते यावर हे सर्व अवलंबून असते. तुम्ही एकतर स्वतःचे चांगले मित्र किंवा शत्रू बनू शकता.”
“आपल्या आजूबाजूचे 10 लोक सकारात्मक असू शकतात, परंतु जर आपण आपले मित्र नसाल तर कोणीही आपल्याला मदत करू शकत नाही. हा हंगाम खूप महत्वाचा आहे. संघातील सहकाऱ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत. जर तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर सहकारी निराश होऊ शकतात. आपल्याला त्याच सहकाऱ्यांसह हॉटेलच्या त्याच जागेत रहावे लागेल. मला वाटते की याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होईल,” असेही पुढे बोलतांना धवन म्हणाला
शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलतांना तो म्हणाला, “मी एकाग्रता आणि मानसिक सामर्थ्यासाठी योग करीत आहे. यामुळे माझे शरीर रिलॅक्स होते. मी माझी फलंदाजी आणि गतिशीलता सुधारत आहे. माझी क्षमता आणि गतिशीलता यामध्ये सुधारणा होत आहे.”
दिल्ली कॅपिटल्स संघ 2020:
श्रेयस अय्यर (कॅप्टन), कागिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, डॅनियल सॅम्स, अलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, एनरिच नॉर्टज, रिषभ पंत, हर्षल पटेल, केमो पॉल, अमित मिश्रा.