आयपीएलमधील (IPL 2022) फ्रॅंचायझी राजस्थान राॅयल्सने (Rajasthan Royals) शुक्रवारी (०४ मार्च) स्टीफन जोन्सची (Steffan Jones) उच्च प्रदर्शन वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. या ४८ वर्षीय माजी वेगवान गोलंदाजाने यापूर्वी २०१९ मध्ये संघाच्या वेगवान गोलंदाज प्रशिक्षकपदाची भूमिका निभावली आहे. त्याच्या या नवीन भूमिकेत जोन्सला राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या सर्व गोलंदाजांना वर्षभर उच्च-श्रेणी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करण्याचे काम असेल. ऑफ सत्रादरम्यान आणि आयपीएल हंगामापूर्वी सरावावर त्यांचे लक्ष असणार आहे.
स्टीफन जोन्स ७ ते १० मार्च या कालावधीत नागपुरातील राजस्थान रॉयल्सच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये पूर्व शिबिरात सामील होईल आणि त्यानंतर आगामी हंगामासाठी गोलंदाजांना तयार करण्यात मदत करण्यासाठी संघासोबत राहील. मेगा लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सने ३ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. राजस्थान रॉयल्सने मेगा लिलावामध्ये २१ खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. राजस्थान रॉयल्स संघामध्ये १६ भारतीय, तर ८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच राजस्थान राॅयल्स संघाकडे ९५ लाख रुपये शिल्लक आहेत.
राजस्थान संघाने संजू सॅमसनला १४ कोटी रुपयांना, जाॅस बटलरला १० कोटी रुपयांना, तर यशस्वी जायसवालला ४ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले होते. राजस्थान संघात समाविष्ट असलेल्या अष्टपैलूंमध्ये शुभम गढवाल (२० लाख), जिमी नीशाम (१.५ कोटी), डेरिल मिचेल (७५ लाख) यांचा समावेश आहे.
राजस्थानच्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये संजू सॅमसन (१४ कोटी), जॅास बटलर (१० कोटी), यशस्वी जायसवाल (४ कोटी), शिमरॉन हेटमायर (८.५० कोटी) , देवदत्त पडिक्कल (७.७५ कोटी), करुण नायर (१.४० कोटी), ध्रुव जुरेल (२० लाख), रासी वेन डेर डुसेन (१ कोटी ), रियान पराग (३.८० कोटी) यांचा समावेश आहे.
राजस्थान राॅयल्स संघाच्या गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्ट (८ कोटी ), प्रसिद्ध कृष्णा (१० कोटी ), युजवेंद्र चहल (६.५ कोटी ), केसी करियप्पा (३० लाख), नवदीप सैनी (२.६० कोटी), ओबेद मैककॉय (७५ लाख), कुलदीप सेन (२० लाख), तेजस बरोका (२० लाख), कुलदीप यादव (२० लाख), नाथन कुल्टर-नाइल (२ कोटी), रविचंद्रन अश्विन (५ कोटी), अनुनय सिंह (२० लाख) या खेळाडूंचा समावेश आहे.
राजस्थानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जायसवाल, देवदत्त पडीक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, जॅास बटलर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचा १०० व्या कसोटीत बीसीसीआय अध्यक्षांच्या विक्रमालाच धक्का, पाहा काय केलाय कारनामा
कोण आहे पाकिस्तानचा युवा सलामीवीर, ज्याने चक्क कमिन्सला फोडला घाम






