---Advertisement---

सीएसके संघाच्या चिंतेत वाढ; पंजाबविरुद्धच्या सामन्याला ‘हे’ दोन खेळाडू मुकणार

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 2:07 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसरी लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडली होती. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ गडी राखून पराभूत केले. या पराभवानंतरही चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या चिंतेत वाढ होणार आहे. याबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या प्रशिक्षकाने वक्तव्य केले आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली संघाच्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या सलामी फलंदाजांनी हा सामना एकतर्फी करून टाकला होता. १३ व्या षटकापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज संघाला एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते.

सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटले की, “जोश हेजलवूडच्या माघार घेण्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. तसेच पंजाब किंग्ज विरुद्ध होणाऱ्या सामन्यात लुंगी एन्गिडी आणि बेहरेनडोर्फ हे उपलब्ध नसणार आहेत.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “गोलंदाजी हा संघाचा कमजोर पक्ष राहिला आहे. आमचे लक्ष भारतीय गोलंदाजांवर आहे. तसेच आमच्याकडे सॅम करन सारखा आंतरराष्ट्रीय गोलंदाज आहे.”

तसेच सुरेश रैनाबद्दल भाष्य करताना स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, “दुसऱ्या डावात हलका पाऊस पडल्याने आमच्यासाठी परिस्थिती कठीण झाली होती. दिल्लीचा संघ खरोखर चांगला खेळला, पण या मैदानावर १९० चांगली धावसंख्या होती आणि आम्हाला अजून चांगली गोलंदाजी करण्याची गरज होती. तसेच रैनाचा फॉर्म संघासाठी सकारात्मक बाजू आहे.”

चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना १६ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बाबर आझमकडून विराट कोहलीने ‘ही’ गोष्ट शिकावी, माजी पाकिस्तानी खेळाडूचे मोठे भाष्य

IPL 2021: कोलकाता संघाची विजयाची सेंच्युरी पूर्ण; त्यांच्यापूर्वी केवळ ‘या’ दोन संघांनीच केला आहे हा कारनामा

भारीच ना भावा! १९ वर्षीय अब्दुल सामदने दिग्गज पॅट कमिन्सविरुद्ध ठोकलेले दोन गगनचुंबी षटकार पाहून व्हाल थक्क

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---