---Advertisement---

या मोठ्या खेळाडूची झाली बांग्लादेशच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती!

On: शुक्रवार, जून 8, 2018 4:26 PM
---Advertisement---

इंग्लंडचे माजी यष्टीरक्षक फलंदाज स्टीव्ह ऱ्होडस यांची बांग्लादेशच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंदिका हाथूरूसिंघा यांनी ऑक्टोबर-२०१७ मध्ये राजीनामा दिल्याने गेल्या आठ महिन्यांपासून हे पद खाली होते.

ऱ्होडस यांचा कार्यकाळ आयसीसी टी२० विश्वचषक २०२० पर्यंत असणार आहे.

आपल्या २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित स्टीव्ह ऱ्होडस यांनी इंग्लंडकडून ११ कसोटी व ९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. ऱ्होडस यांनी यॉर्कशायर व वोरसेस्टशायरकडून खेळताना काउंटी क्रिकेट गाजवले आहे.

वोरसेस्टशायर क्रिकेटचे ऱ्होडस आयुक्त होते. तसेच ते इंग्लंडच्या U19 टीमचे विश्वचषकासाठी मुख्य प्रशिक्षक होते. पण मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बलात्काराच्या मोठ्या वादामुळे त्यांना दोन्ही पदे गमवावी लागली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment