लंडन। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर ऍशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 225 धावा केल्या. त्यांच्याकडून या डावात स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 145 चेंडूत 80 धावांची खेळी केली.
स्मिथची इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ही सलग 10 वी वेळ आहे. तसेच 2019 ऍशेस मालिकेत स्मिथने सलग सहा डावात 75 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
स्मिथने या 2019 ऍशेस मालिकेत 1 द्विशतक, 2 शतके आणि 3 अर्धशतके केली आहे. त्याने या ऍशेसमध्ये खेळलेल्या 6 डावात अनुक्रमे 144, 142, 92, 211, 82, 80 अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
स्मिथने केले हे खास विक्रम –
#एका कसोटी मालिकेत सर्वाधिकवेळा 750 + धावा करणारे फलंदाज –
4 वेळा – डॉन ब्रॅडमन
2 वेळा – ब्रायन लारा
2 वेळा – स्टिव्ह स्मिथ
#कसोटीत एकाच प्रतिस्पर्धी विरुद्ध सर्वाधिकवेळा सलग 50+ धावांची खेळी करणारे फलंदाज –
10 – स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 2017-2019)*
9 – इंझमाम-उल-हक (पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, 2001-2006)
8 – क्लाईव्ह लॉइड (वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड, 1980-1984)
8 – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, 2007-2010)
8 कुमार संगकारा (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, 2009-2014)
#एका कसोटी मालिकेत सर्वाधिक डावात 75 + धावांची खेळी करणारे फलंदाज –
6 डाव – स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 2019)*
6 डाव – क्लाइड वॉलकोट (वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1955)
#ऍशेसमध्ये सर्वाधिकवेळा सलग 50+ धावांची खेळी करणारे फलंदाज –
10 – स्टिव्ह स्मिथ
6 – मायकल हसी
#एका कसोटी मालिकेत 6 किंवा त्यापेक्षा कमी डाव खेळताना 750 + धावा करणारे फलंदाज –
806 – डॉन ब्रॅडमन (5 डाव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1931)
752 – ग्रॅहम गूच (6 डाव, इंग्लंड विरुद्ध भारत, 1990)
751 – स्टिव्ह स्मिथ (6 डाव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 2019)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कसोटी इतिहासात कोणालाही जे जमले नाही ते स्टिव्ह स्मिथने करुन दाखवले!
–८० धावांची खेळी करत स्मिथने केली ६४ वर्षांपूर्वीच्या या विश्वविक्रमाची बरोबरी
–कोणालाही आवडणार नाही असा विक्रम करणारा वॉर्नर पहिलाच सलामीवीर फलंदाज