---Advertisement---

सोशल मीडियावर अशी भावूक पोस्ट करत स्टिव्ह स्मिथने केले आयपीएल २०१९ला गुडबाय…

On: बुधवार, मे 1, 2019 8:16 PM
---Advertisement---

बंगळूरु। मंगळवारी(30 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेला 49 वा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. हा सामना राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथचा आयपीएल 2019 मधील शेवटचा सामना होता.

पावसामुळे 5-5 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात बेंगलोरने विजयासाठी दिलेल्या 63 धावांच्या आव्हानाचा राजस्थान पाठलाग करत असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली.  त्यामुळे राजस्थानची धावसंख्या 3.2 षटकात 1 बाद 41 धावा अशी असताना अखेर पंचांनी हा सामना रद्द केला आणि दोन्ही संघाना एक- एक गुण दिला.

या सामन्यानंतर स्मिथने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की ‘ राजस्थान रॉयल्स मागील 7 आठवड्यांसाठी आभार. मी या आयपीएलमधील प्रत्येक मिनीटाची मजा घेतली. तसेच मला आनंद आहे की मी अशा संघाचा एक भाग आहे. पुढील दिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी शुभेच्छा.’

स्मिथने यावर्षी आयपीएलमध्ये एक वर्षांनंतर पुनरागमन केले होते. त्याच्यावर मागीलवर्षी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये 3 अर्धशतकांसह 39.87 च्या सरासरीने 275 धावा केल्या.

तसेच त्याने राजस्थानच्या पहिल्या 7 सामन्यानंतर संघाची कर्णधार पदाची जाबबदारी सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली पुढिल 5 सामने खेळताना राजस्थानने 3 सामने जिंकले तर 1 सामन्यात पराभव स्विकारला.

पण 2019 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा 2 मे पासून ट्रेनिंग कॅम्प सुरु होणार आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळालेले खेळाडू 2 मे आधी पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत. यामुळे स्मिथलाही मायदेशी परतावे लागले आहे.

स्मिथ हा या विश्वचषकातून मागील एक वर्षांच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत. स्मिथ आणि वॉर्नरवर मागील वर्षी मार्चमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणामुळे 1 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली होती. पण आता ही बंदी उठली आहे.

https://www.instagram.com/p/Bw5J2sIJm1c/?utm_source=ig_embed

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०१९मध्ये हॅट्रिक घेणारा श्रेयस गोपाळ ठरला दुसरा गोलंदाज, पहा व्हिडिओ

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात धोनीच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह, प्रशिक्षक फ्लेंमिंगने दिली माहिती

ऑस्ट्रेलियाचा तो क्रिकेटपटू रोहित शर्माशी बोलला चक्क मराठीत, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment