---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा तो क्रिकेटपटू रोहित शर्माशी बोलला चक्क मराठीत, पहा व्हिडिओ

On: बुधवार, मे 1, 2019 3:36 PM
---Advertisement---

1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून राज्यभरात साजरा होत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सनेही खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेऱ्हेनडॉर्फला मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव मराठी शिकवत आहे. काही वाक्य मराठीमध्ये शिकल्यानंतर बेऱ्हेनडॉर्फने याचा वापर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माशी बोलताना केला आहे.

यादवने बेऱ्हेनडॉर्फला पहिल्यांदा त्याने नाव सांगायला शिकवले, यावेळी त्याने बेऱ्हेनडॉर्फला बोलायला सांगितले की ‘माझे नाव जेसन आहे. मी बॉलिंग करतो.’ यादवच्या मागे बेऱ्हेनडॉर्फही तेच वाक्य परत म्हणाला. यानंतर यादवने बेऱ्हेन्डॉर्फला ‘कसं कायं पलटन’ असे बोलायला शिकवले. बेऱ्हेनडॉर्फही मजेने हे शिकत होता. यावेळी यादव त्याला प्रोत्साहनही देत होता.

यादवने नंतर बेऱ्हेन्डॉर्फला ‘लयं भारी मुंबई’ असेही बोलायला शिकवले. यानंतर बेऱ्हेनडॉर्फ रोहित जवळ गेला आणि त्याला म्हणाला, कसं काय रोहित? यावर रोहित त्याला म्हणाला ‘मजेत.’ पण पुढे लगेच बेऱ्हेनडॉर्फ म्हणाला ‘लय भारी.’

बेऱ्हेनडॉर्फचे असे मराठी ऐकून रोहितलाही आश्चर्य वाटले. रोहित पुढे बेऱ्हेनडॉर्फला म्हणाला, ‘तू ही भाषा शिकत आहेस का’ त्यावर बेऱ्हेनडॉर्फ म्हणाला ‘हो, मी ही भाषा शिकत आहे आणि यादव चांगला शिक्षक आहे.’ पुढे रोहित म्हणाला, ‘पुढच्या वेळी तू येशील तेव्हा तू कदाचीत पूर्ण महाराष्ट्रीयन मुलगा बनलेला असशील.’

बेऱ्हेनडॉर्फ मुंबईकडून यावर्षी आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 5 सामने खेळला असून यात त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. पण आयपीएल संपण्यापूर्वीच बेऱ्हेनडॉर्फ विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाला परतला आहे.

याबद्दल त्याने ट्विटरवर माहिती देताना मुंबई इंडियन्ससाठी एक संदेश लिहिला आहे. त्याने ट्विट केले आहे की ‘माझा या फ्रेन्चायझीबरोबर पहिला आयपीएल अनुभव मस्त होता. मुंबई इंडियन्सबरोबर मजा केली. असेच चांगले खेळत रहा. तूम्ही अंतिम सामन्यात पोहचाल अशी अपेक्षा करतो.’

महत्त्वाच्या बातम्या –

किंग्स इलेव्हन पंजाबसमोरील अडचणीत वाढ, निलंबणाची शक्यता

मराठमोळ्या केदारने केले आपल्या चाहत्याला खुष!!!

आता क्रिकेट सोडून विराट कोहलीने केला याचा सराव सुरु…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment