आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा सहसंघमालक नेस वाडियाला जपानमध्ये ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे किंग्स इलेव्हन संघासमोरील अडचणीतही वाढ झाली आहे.
आयपीएलच्या नियमांप्रमाणे संघाच्या कोणत्याही अधिकारीने अशी वर्तवणूक करु नये ज्यामुळे संघाची, बीसीसीआयची किंवा खेळाचा अपमान होईल. जर असा अधिकारी दोषी ठरला तर संघावर बंदी घातली जाऊ शकते. पण हे प्रकरण आधी चौकशीसाठी आयोगाकडे पाठवले जाईल. त्यानंतर आयोग या प्रकरणाला लोकपालांकडे पाठवेल.
याआधीही चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या या नियमांचा फटका बसला आहे. त्यांचा अधिकारी गुरुनाथ मय्यपन सट्टेबाजी प्रकरणात अडकल्याने त्यांच्यावर 2016 आणि 2017 या दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की पंजाब संघाच्याही अडचणीत वाढ होऊ शकते.
याबद्दल अधिकाऱ्याने सांगितले की ‘संघ मालक ड्रग्स बाळगल्या प्रकरणात अडकल्याने किंग्स इलेव्हन पंजाब संघावर निलंबणाची कारवाई होऊ शकते. लोढा समीतीने चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांची बंदी घातली होती. कारण त्यांचा एक अधिकारी सट्टेबाजी प्रकरणात अडकला होता.’
‘या प्रकरणात आमच्याकडे न्यायालयाने ड्रग्स बाळल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवलेला मालक आहे. जर तो राज्य क्रिकेट अधिकारी असता तर तो पद सांभाळण्यासाठी आपोआपच अयोग्य ठरला असता.’
ते पुढे म्हणाले, ‘हे नवीन बीसीसीआयच्या संविधानातील भेदभावपूर्ण तरतुदींना देखील उघड करते. जे राज्य संघटनेसाठी कठोर आहे परंतु फ्रेन्चायझी अधिकाऱ्यांवर कोणतेही बंधन ठेवलेले नाही, जरी आयपीएलमधील कामगिरी रणजी ट्रॉफीतील कामगिरीपेक्षा भारतीय संघातील निवडीसाठी अधिक लक्षात घेतली जाते.’
काही रिपोर्ट्स नुसार वाडीया यांना 20 मार्चला दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना उत्तर जपानमधील द्वीप होकाइडूमधील न्यू चिटोस विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे 25 ग्रॅम गांजा सापडला होता.
असे असले तरी बीसीसीआयच्या कार्यकारीने म्हटले आहे की या गंभीर प्रकरणाबाबत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
याबद्दल कार्यकारी म्हणाले, ’24 तास होऊन गेेले आहेत तरी या प्रकरणात बीसीसीआयच्या सीईओ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आपण वाट पाहत आहोत का कोणीतरी बीसीसीआयच्या प्रतिमेआड येऊन मैत्री बनवेल आणि खेळाच्या पवित्रतेवर आणि प्रशासनावर प्रश्न उभा करेल?’
महत्त्वाच्या बातम्या –
–मराठमोळ्या केदारने केले आपल्या चाहत्याला खुष!!!