---Advertisement---

याला म्हणतात खिलाडूवृत्ती! बेन स्टोक्सच्या पुनरागमनाबाबत स्टीव्ह स्मिथने दिली मोठी प्रतिक्रिया

On: बुधवार, ऑक्टोबर 27, 2021 11:01 PM
---Advertisement---

सध्या सर्वत्र आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेची चर्चा रंगली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ॲशेस कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतून इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पुनरागमन करणार आहे. त्याच्या पुनरागमनाबाबत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.

ॲशेस कसोटी मालिकेला ८ डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पुनरागमन करणार आहे. बेन स्टोक्सने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती.

त्याच्या पुनरागमनाबाबत बोलताना स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, “ही खूप चांगली गोष्ट आहे की, बेन स्टोक्स उपलब्ध असणार आहे. कोणीही मानसिक आरोग्याचा समस्येतून बाहेर येतं, ही चांगलीच गोष्ट आहे. आम्हालाही सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध खेळायला आवडतं.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “बेन स्टोक्ससारखा खेळाडू खेळत असेल तर कुठलाही संघ आणखी मजबूत संघ होऊन जातो. त्याच्यामुळे संघात आणखी खोली वाढते. पण आमचा उत्साह आणखी वाढला आहे. वैयक्तिकरित्या मी खूप खुश आहे की, तो खेळण्यासाठी परतला आहे. ही मालिका आणखी रंगतदार होणार आहे.” (Steve Smith big statement on Ben stokes comeback in ashes series)

स्टीव्ह स्मिथ देखील काही दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त होता. त्याला गेल्या काही महिन्यांपासून कोपरचा त्रास होतोय. त्याच्या दुखापतीबाबत स्पष्टीकरण देत तो म्हणाला की,” माझे कोपर आता ठीक आहे. मला ठीक वाटतंय. मी माझे स्ट्रेंथ आणि पुनर्वसनाचे कार्य सुरू ठेवत आहे. त्यामुळे मला असे वाटते की मी चांगले काम करत आहे आणि चांगली प्रगती देखील होत आहे. मला ॲशेस मालिकेत दुखापतीची काहीच चिंता नसेल.”

स्मिथ आणि स्टोक्स आयपीएलमध्ये एकत्र खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषक: नामिबियाच्या गोलंदाजाचा ऐतिहासिक कारनामा; सामन्याच्या पहिल्याच षटकात काढल्या तब्बल ३ विकेट्स

राहुलला रिटेन करणार का? संघमालक नेस वाडियांनी दिले ‘फायनल’ उत्तर

चौफेर टीकेचे झोड उठल्यानंतर वकार युनूसने वादग्रस्त विधानाबद्दल भारतीयांची मागितली माफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---