आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यासाठीचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) देखील मोठ्या उत्साहात पार पडला. लिलावादरम्यान सर्व फ्रँचायझींनी आपला संघ मजबूत बनवला. पण आयपीएलच्या या 18व्या हंगामाच्या मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू अनसोल्ड ठरले. यामध्ये स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) सारख्या दिग्गजांची नावे समाविष्ट आहेत.
आयपीएल 2025च्या मेगा लिलावात न विकले गेलेले अनेक खेळाडू टी20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. ते आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करत आहे. या बातमीद्वारे आपण अशा 3 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया. जे आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड ठरल्यानंतर चमकदार कामगिरी करत आहेत.
1) डेव्हिड वॉर्नर- डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या विदेशी फलंदाजांपैकी एक आहे. यावेळी वॉर्नरही आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. वॉर्नर बीबीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्याने गेल्या 4 सामन्यात 3 अर्धशतके झळकावली आहेत. आता आयपीएल 2025 मध्ये कोणताही संघ वॉर्नरला खेळाडूच्या जागी संधी देतो की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
2) स्टीव्ह स्मिथ- मेजर लीग क्रिकेट 2024 मध्ये स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आयपीएल 2025च्या मेगा लिलावात तो खूप कमाई करू शकेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण असे झाले नाही, कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही. बिग बॅश लीगच्या चालू हंगामातील पहिल्याच सामन्यात स्मिथने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने नाबाद 121 धावा केल्या. दरम्यान त्याने 10 चौकारांसह 7 षटकार ठोकले.
3) केन विल्यमसन- न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) यंदा आयपीएल 2025च्या मेगा लिलावात खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. लिलावासाठी विल्यमसनची मूळ किंमत 4 कोटी होती. पण कोणत्याही फ्रँचायझीने त्याला खरेदी केले नाही. सध्या हा अनुभवी फलंदाज एसए20 लीगच्या तिसऱ्या हंगामात डर्बन सुपर जायंट्सकडून खेळत आहे. दरम्यान त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. त्याने नाबाद 60 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 3 चौकारांसह 2 षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमी परतला, पंतला विश्रांती! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा! आफ्रिकेविरूद्धच्या पराभवानंतर संघात मोठे बदल
बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा पुढे का ढकलली? कारण खूप ‘गंभीर’!