आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतेच दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचे क्रिकेट अवॉर्ड जाहीर केलेले आहेत. या दरम्यान मानाचा समजला जाणारा दशकातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथने पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे स्मिथने दशकाची सुरुवात एक गोलंदाज म्हणून केली होती. त्यानंतर स्मिथने आपल्या फलंदाजी कौशल्यात निपुणता मिळवत संपूर्ण क्रिकेटविश्वात आपल्या फलंदाजीचा डंका वाजवला. स्मिथने या दशकात तब्बल 65 च्या सरासरीने धावा बनवल्या आहेत.
या पुरस्कारांसाठी 1 जानेवारी 2011 ते 7 ऑक्टोबर 2020 या कालावधीलीतील कामगिरी आणि चाहत्यांची मते लक्षात घेण्यात आली आहेत.
स्मिथने या दशकात तब्बल 26 शतक व 28 अर्धशतकांसह 7040 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 65.79 इतकी उत्तम राहिलेली आहे. स्मिथ मागील अनेक वर्षांपासून सातत्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे.
🇦🇺 STEVE SMITH is the ICC Men’s Test Cricketer of the Decade 👏👏
🏏 7040 Test runs in the #ICCAwards period
🅰️ 65.79 average ➜ Highest in top 50
💯 26 hundreds, 28 fiftiesUnique, relentless and unbelievably consistent 🙌 pic.twitter.com/UlXvHaFbDz
— ICC (@ICC) December 28, 2020
या दशकामध्ये स्मिथच्या कामगिरीकडे डोकावून पाहिले असता, दोन मालिकांमध्ये त्याने आपल्या खेळाने संपूर्ण क्रिकेटविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 2014 -15 साली ऑस्ट्रेलियात भारताविरुद्ध झालेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने 4 शतकं केली होती. या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटविश्वात स्मिथ युगाची सुरूवात झाली.
सन 2018 साली चेंडू छेडछाड वादामध्ये अडकल्याने स्मिथवर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने 1 वर्षाची बंदी घातली होती. ही बंदी पूर्ण करुन स्मिथ जेव्हा 2019 साली इंग्लंड येथे झालेल्या ऍशेस मालिकेमध्ये पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याच्यावर निश्चितच मोठ्या प्रमाणात दबाव होता. मात्र या दबावाला झुगारत त्याने पहिल्याच सामन्यातील दोन्ही डावात शतकी खेळी केली व पुन्हा एकदा स्पष्ट केले की कसोटी क्रिकेटचा राजा तोच आहे.
आईसीसीने कसोटी खेळाडू सोबतच दशकातील सर्वोत्तम वनडे व टी20 क्रिकेटपटूंचीही घोषणा केली आहे. विराट कोहली दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडू तर अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू राशिद खान का दशकातील सर्वोत्तम टी20 खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! ‘रनमशीन’ विराट कोहली ठरला आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर