आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथ पुन्हा क्रिकेटमध्ये परतोय. तो टोरंटोमध्ये होणाऱ्या पहिल्या ग्लोबल टी२० कॅनडा लीगमध्ये खेळणार आहे.
सध्या क्रिकेटपासून दुर असलेल्या स्मिथला या लीगमध्ये एलिट गटातील खेळाडू म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.
ही लीग २६ जून ते १५ जूलै या काळात मॅपल लिप क्रिकेट क्लबवर टोरंटोमध्ये होणार आहे. यात सहा संघ सहभागी होणार आहे.
या स्पर्धेत ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, ड्वेन ब्रावो, लसिथ मलिंगा, ख्रिस लीन, डॅरेन सॅमी, डेविड मीलर, सुनिल नारायण आणि आंद्रे रसेल हे एलिट गटातील खेळाडू भाग घेणार आहेत.
खेळाडूंची निवड ३०मे रोजी करण्यात येणार आहे.
स्मिथ सध्या क्रिकेटपासुन दुर आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर त्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला बंदी आहे मात्र तो लीग क्रिकेट मात्र खेळू शकतो.
स्मिथप्रमाणेच सप्टेंबर महिन्यात आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार डेविड वार्नरही पुनरागमन करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची वनडेत तुफानी फटकेबाजी
–सलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम
–प्रिय एबी, क्रिकेटला परिपुर्ण बनवल्याबद्दल थँक्यू !
–चेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल!
–विराटचं फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडलं महागात
–यापेक्षा खतरनाक आकडेवारी तुम्ही एबीबद्दल नक्कीच वाचली नसणार!