ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथ (steve smith) मोठ्या काळापासून अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. सध्या खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेतील (ashes series) पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात स्मिथ शून्य धावांवर बाद झाला. इंग्लंडच्या ओली रॉबिन्सनने (ollie robinson) अवघ्या दोन चेंडूत त्याची विकेट घेतली. स्मिथच्या चाहत्यांना आता त्याचे शतक पाहण्यासाठी अधिक वाट पाहावी लागणार आहे. स्मिथने त्याचे शेवटचे शतक भारताविरुद्ध सिडनीमध्ये जानेवारी २०२१ मधील सामन्यात केले होते. सप्टेंबर २०१९ नंतर आतापर्यंत म्हणजेच जवळपास २ वर्ष आणि चार महिन्यांमध्ये स्मिथच्या चाहत्यांना फक्त एकदाच त्याची शतकी खेळी पाहायला मिळाली आहे.
स्मिथ या सामन्यात शुन्य धावांवर बाद झाला असून यापूर्वी तो डिसेंबर २०२० मध्ये स्वतःचे खाते खोलू शकला नव्हता. मागच्या सात कसोटींमध्ये ही दुसरी वेळ आहे, जेव्हा तो शून्य धावांवर तंबूत परतला. स्मिथने २०१९ मध्ये संघात पुनरागमन केल्यानंतर खेळलेल्या १८ कसोटी सामन्यांमध्ये केवळ चार शतके आणि नऊ अर्धशतके केली आहेत.
सन २०१९ मध्ये स्मिथने आठ कसोटी खेळल्या होत्या, ज्यामध्ये त्याने तीन शतके ठोकलेली. परंतु, २०२१ मध्ये खेळलेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये तो फक्त एक शतक करू शकला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये त्याने ११ कसोटी सामन्यांमध्ये सहा, २०१६ मधील ११ कसोटी सामन्यांमध्ये चार, तर २०१५ मध्ये खेळलेल्या १३ कसोटी सामन्यांमध्ये सहा शतके ठोकली होती. २०१५ ते २०१७ दरम्यान त्याच्या शतकांची सरासरी २.१ होती, म्हणजेच तो प्रत्येक दुसऱ्या सामन्यात शतक करत होता.
२०१९ नंतर फक्त ४ कसोटी शतक
सन २०१९ नंतर स्मिथने कसोटी क्रिकेटमधील २९ डावांमध्ये केवळ चार वेळा शतक केले आहे. यादम्यान त्याच्या शतकांची सरासरी ७.२ पर्यंत घसरली आहे, म्हणजेच तो दर सात सामन्यांमध्ये एक शतक करत आहे. २०१९ मधील ऍशेस मालिकेत त्याने तीन शतके ठोकली होती. यानंतर त्या वर्षी त्याने एकही शतक केले नाही. अशात सप्टेंबर २०१९ नंतर स्मिथचे कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. दरम्यानच्या काळात त्याने ४० च्या सरासरीने धावा केल्या.
जानेवारी २०२० नंतर सहावेळा १० पेक्षा कमी धावसंख्येवर बाद
भारताविरुद्ध २०२०-२१ मध्ये खेळलेल्या चार कसोटींमध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक केले होते. तसेच यावर्षी ऍशेसमध्येही तो फक्त दोन अर्धशतके करू शकला होता. यापैकी एका डावात त्याने ९३ धावा केल्या होत्या. जानेवारी २०२० नंतर १० कसोटींमध्ये तो सहा वेळा दोन आकडी धावसंख्येपर्यंत देखील पोहोचू शकला नव्हता.
महत्वाच्या बातम्या –
SAvsIND: केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिका ‘विराटसेने’वर भारी! भारताने पराभवाबरोबरच मालिकाही गमावली
किती गोड!! पॅव्हेलियनमध्ये परतताना विराटची वामिकासोबत मस्ती, व्हिडिओ व्हायरल
केकेआरला मिळाला नवा ‘गोलंदाजी गुरु’; भारतीय क्रिकेटसाठी दिलेय अतुल्य योगदान
व्हिडिओ पाहा –