भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाचा ५१ धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून मधल्या फळीतील फलंदाज स्टीव स्मिथने शतक झळकावत सामनावीर पुरस्कार देखील पटकावला.
मात्र, सामना संपल्यानंतर स्टीव स्मिथने एक धक्कादायक खुलासा केला. “सामन्यापूर्वी चक्कर येत असल्याने मला बरेच अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे मी सामना खेळेन की नाही, याची शाश्वती नव्हती,” असे स्मिथ म्हणाला.
उपचारानंतर सुधारणा झाली
स्टीव स्मिथ आपल्या तंदुरुस्तीबद्दल बोलताना म्हणाला, “सकाळी मला जेव्हा चक्कर येत होत्या, तेव्हा मी बहुधा हा सामना खेळणार नाही, असेच मला वाटले होते. मात्र, संघाचे डॉक्टर लेग गोल्डिंग यांनी केलेल्या उपचारानंतर मला बरीच सुधारणा जाणवली. मैदानात उतरल्यावर देखील काही काळ मला समस्या जाणवत होती. परंतु नंतर सगळे सुरळीत झाले. मी एक चांगली खेळी करून संघाच्या विजयात योगदान देता आले असल्याने समाधानी आहे.”
स्मिथच्या शतकाने ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय
ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना ४ विकेट्स गमावत ३८९ अशी धावसंख्या उभारली. ज्यात स्टीव स्मिथच्या ६४ चेंडूतील १०४ धावांच्या वादळी खेळीचा समावेश होता. भारतीय संघाला ३८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना ३३८ धावाच करता आल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
“वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास भारतीय संघाला फायदाच होईल”
ट्रेंडिंग लेख-
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
या ५ कारणांमुळे भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
क्रिकेट जगतातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी ‘रन-अप’, घातक गोलंदाजीसाठी व्हायची मदत