ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी फलंदाज स्टीव स्मिथ याने एक असा विक्रम केला आहे, जो मोडणे भारतीय दिग्गज विराट कोहली याच्यासाठी शक्य नसेल. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्मिथ सध्या मायदेशात बीग बॅश लीगमध्ये खेळत आहे. सिडनी सिक्सर्स संघासाठी खेळताना स्मिथने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत एडिलेड स्ट्रायकर्सविरुद्ध शतक ठोकले. शतक करण्यासाठी स्मिथने अवघ्या 56 चेंडूंची मदत घेतली. स्मिथच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर सिडनी सिक्सर्स संघाने मोठी धावसंख्या उभी केली.
एडिलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) संघाचा कर्णधार ट्रेविस हेड () याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) संघा प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. सिडनी संघासाठी जोश फिलिप आणि स्टीव स्मिथ (Steve Smith) सलामीसाठी उभे राहिले. जोस फिलिप स्वस्तात बाद झाला, पण स्मिथने संघासाठी शतक ठोकले. फिलिप सामन्याच्या पहिल्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर एक धाव करून बाद झाला. त्यानंतर स्मिथला कुर्तिस पॅटरसन (Kurtis Patterson) याची चांगली साथ मिळाली आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर सिडनी संघाने सामन्यात मोटी धावसंख्या उभी केली आणि समाना देखील जिंकला.
History: Steve Smith becomes the first male cricketer to score hundred for Sixers in BBL.
Take a bow, Smithy. pic.twitter.com/OH4NwpC5sY
— Johns. (@CricCrazyJohns) January 17, 2023
स्मिथने 56 चेंडूत ठोकले शतक –
पॅटरसनने मंगळवारी (17 जानेवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात 33 चेंडूत 43 धावा केल्या. यानंतर स्मिथने 56 चेंडूत 5 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 101 धावांची खेळी केली. स्मिथच्या टी-20 कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. तसेच सिडनी सिक्सर्स संघासाठी एखाद्या फलंदाजाने केले देखील हे पहिलेच शतक ठरले आहे. विराट कोहली (Virat Kohli) स्मिथचा हा विक्रम कधीच मोडू शकरणार नाही, असे सध्या सांगितले जात आहे. कारण विराट त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत कधी बीबीएल खेळेल, याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आपल्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही.
सिडनी सिक्सर्सने केल्या 5 बाद 203 धावा –
स्मिथच्या वादळी खेळीच्या जोरावर सिडनी सिक्सर्स संघाने 5 विकेट्सच्या नुकसानावर 203 धावा केल्या. प्रत्युत्तर ट्रेविस हेडच्या नेतृत्तवातील एडिलेड स्ट्रायकर्स संघ 19 षटकात 144 धावांवर सर्वबाद झाला. एडिलेड स्ट्रायकर्ससाठी मॅथ्यू शॉर्ट्स आणि एलेक्स कॅरी (Alex Carey) यांनी या सामन्यात अनुक्रमे 40 आणि 54 धावांची खेळी केली. (Steve Smith scored a 56-ball century for the Sydney Sixers)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध
सचिनच्या 100 शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला काय करावे लागेल? गावसकरांनी सांगितला मार्ग