ऑस्ट्रेलियन संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला २०१८ मध्ये बॉल टेंपरींग प्रकरणामुळे २ वर्षासाठी कर्णधार पदावरून हटवण्यात आले होते. यासोबतच त्याच्यावर एक वर्षासाठी खेळण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. स्मिथ ऑस्ट्रेलियन संघातील प्रमुख फलंदाज आहे. तब्बल ३ वर्षांनंतर त्याने पुन्हा एकदा कर्णधारपद स्विकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने अनेक सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु २०१८ नंतर त्याला कर्णधार पदावरून काढून टीम पेनला कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. तसेच मर्यादित षटकांची धुरा ऍरॉन फिंचच्या हातात देण्यात आली होती.
२ वर्षाचा निर्बंध संपल्यानंतर व आता त्या प्रकरणाला तीन वर्ष पुर्ण झाल्यानंतर स्मिथने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला,” याबद्दल विचार करण्यास माझ्याकडे बराच वेळ होता, परंतु मला असे वाटते की आता मी अशा एका टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मला पुन्हा एकदा ही जबाबदारी स्वीकारण्यास आवडेल. जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला योग्य वाटत असेल आणि यात ऑस्ट्रेलियन संघाचे हित असेल तर मी ही जबाबदारी स्वीकारण्यास नक्कीच तयार आहे.”
तसेच स्मिथ पुढे म्हणाला,”वेळ नेहमी पुढे जात असते, गेल्या काही वर्षांमध्ये मी खूप काही शिकलो आहे. मला असे वाटते की ,मला जर संधी मिळाली तर मी हे नक्की करेल.परंतु जर असे नाही झाले तरी ठीक आहे. जो कोणी संघाचा कर्णधार असेल मी त्याचे समर्थन करेल. ज्याप्रकारे मी टीम पेन आणि ऍरॉन फिंच यांचे समर्थन केले आहे. मी कधीच संघाचे नेतृत्व करण्याचा विचार केला नव्हता. परंतु गेल्या महिन्यांत मी हा विचार नक्की करत आहे. ”
स्मिथची कर्णधार म्हणून कारकीर्द
स्टीव्ह स्मिथ याने ऑस्ट्रेलियन संघासाठी एकूण ३४ कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. यात त्याला १८ सामने जिंकण्यात यश मिळाले आहे. तसेच त्याला ५१ वनडे सामन्यात २५ सामने जिंकवून देण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने ८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला ४ सामन्यात विजय मिळवून दिले आहेत.
हेही वाचा-
–क्रिकेट ऑस्ट्रेलियातील या दिग्गज व्यक्तीने स्टिव स्मिथला पुन्हा कर्णधार करण्यास दिलाय नकार
–जंटलमन हॅश- दारुच्या ब्रँडचा लोगो जर्सीवर न लावल्यामुळे लाखो रुपये गमावलेल्या हशिम आमलाची गोष्ट
–क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! चार एप्रिल रोजी बांगलादेशात होणार भारत-पाकिस्तान संघात क्रिकेटचा थरार