ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा (Ashes series) थरार सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या ३ सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला आहे. यासह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४-० ची आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसात संपला. ज्यामुळे खेळाडूंना विश्रांती करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान गुरुवारी (३० डिसेंबर) स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) सोबत एक अजब गजब घटना घडली आहे.
ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या हॉटेलच्या रूममध्ये जाण्यासाठी लिफ्टचा वापर केला. मात्र, त्यावेळी तो लिफ्टमध्येच अडकला होता. त्याने अनेक प्रयत्न केले, तरीदेखील त्याला लिफ्टचा दार उघडता येत नव्हता. त्याने हा अनुभव आपल्या एक इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितला आहे.
Steve Smith stuck in a lift but didn’t forget giving banger content. a true influencer pic.twitter.com/q6ltkFQ3a9
— best girl (@awkdipti) December 30, 2021
स्टीव्ह स्मिथने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणाला की, “लिफ्ट बहुधा सेवेत नव्हती, पण मी त्यात चढलो आणि अडकलो. मी लिफ्टच्या आतून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता, तर मार्नस लॅब्युशेन लिफ्टच्या बाहेरून तेच करण्याचा प्रयत्न करत होता.” (Ashes series)
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी फ्लोअरवर होतो. परंतु दरवाजे उघडत नव्हते. मी लिफ्टच्या आतून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतो. तर मार्नस लॅब्युशेन बाहेरून उघडण्याचा प्रयत्न करता होता. खरं सांगायचं झालं तर, ही अशी संध्याकाळ नव्हती, ज्याची आम्ही योजना बनवली होती. ”
Quality content from Steve Smith stuck in a lift last night. Marny to the rescue! 😆 #Ashes pic.twitter.com/qiGU60QLBs
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) December 31, 2021
अनेक प्रयत्न करून सुद्धा जेव्हा दार उघडले नाही, त्यावेळी तो लिफ्टमध्येच बसला. त्यानंतर त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना विचारले की, जर एखादा व्यक्ती लिफ्टमध्ये अडकला तर काय करावं. यावेळी लॅब्युशेनने स्मिथला लिफ्टच्या दरवाजातील फटीतून खायलाही दिले होते. अखेर ५५ मिनिटांनंतर लिफ्टचा दरवाजा काही लोकांनी उघडला. त्यानंतर स्मिथ लिफ्टमधून बाहेर पडला.
महत्वाच्या बातम्या :
भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटला केला अलविदा
हे नक्की पाहा :