ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव स्मिथ गुरुवारी (6 जुलै) स्वस्तात बाद झाला. ऍशेस 2023चा तिसरा कसोटी सामना गुरुवारी हेडिंग्लेमध्ये सुरू झाला. स्मिथच्या कारकिर्दीतील हा 100वा कसोटी सामना आहे. मात्र, पहिल्या डावात इंग्लंडचा दिग्गज स्टीअर्ट ब्रॉड याने त्याला स्वस्तात बाद केले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडला विजय मिळवणे गरजेचे आहे, जेणेकरून मालिकेतील त्यांचे आव्हान कायम राहील. गुरुवारी हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लिश गोलंदाज पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकले नव्हते. पण हेडिंग्लेमध्ये पहिल्याच सत्रात त्यांनी भेदक मारा केला. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 91 धावा केल्या होत्या.
स्टीव स्मिथ (Steve Smith) याच्या रुपात ऑस्ट्रेलियाा चौथा धक्का बसला. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने टाकलेल्या 25व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्मिथ यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या हातात झेलबाद झाला. त्याने 31 चेंडूत 22 धावा करून विकेट गमावली. कारकिर्दीतील 100व्या कसोटीत स्मिथकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण पहिल्या डावात त्याला या अफेक्षेवर खरे उतरता आले नाही. दुसऱ्या डावात स्मिथकडे मोठी खेळी करण्याची संधी असेल.
स्मिथने आतापर्यंत 100 कसोटी सामन्यांमधील 176 डावांमध्ये 9135 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून चार द्विशतक, तर 32 शतके आली आहेत. 239 ही त्याची कसोटी फॉरमॅटमधील सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 142 सामने खेलले आहेत, ज्यात 4939 धावा केल्या आहेत. स्मिथने या फॉरमॅटमध्ये 12 शतक आणि 29 अर्धशतके केली आहेत. 164 ही त्याची सर्वोत्कृष्ट वनडे खेळी आहे. (Steve Smith was dismissed for 22 runs in his 100th Test match)
महत्वाच्या बातम्या –
धोनीचे 10 विक्रम, जे आजही आहेत अबाधित; मोडणे अवघड नाही, तर अशक्यच!
ASHES । मार्क वुडने जाळला स्पीडोमीटर! भेदक गोलंदाजीपुढे उस्मान ख्वाजा क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ