ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ येत्या काळात नवीन जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत स्टीव स्मिथ आपल्या संघासाठी डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. पुढच्या वर्षी टी-20 विश्वचषक असून त्यासाठी स्मिथला सलामीवीर म्हणून तयार करण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापनाचा असणार आहे.
आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि डेविड वॉर्नर (David Warner) ऑस्ट्रेलियन संघाचे सलामीवीर असतील, अशा बातम्या समोर येत आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रमुख निवडकर्ते जॉर्ज बेली (George Bailey) यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. 30 ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत स्मिथ सलामीवीर म्हणून खेळणार आहे. बीग बॅश लीगमध्ये मागच्या हंगामात त्याने सलामीवीर म्हणून खेळताना शतक ठोकले होते.
मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात स्टीव स्मिथ आपल्या खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. पण यावर्षी त्याचा फॉर्म आणि क्षमता पाहून निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. स्मिथसाठी हे जबरदस्त पुनरागमन म्हणता येईल. स्टीव स्मिथ शक्यतो तीन किंवा चार क्रमांकावर फलंदाजीला येत असतो. पण बीग बॅश लीगच्या मागच्या हंगामात त्याने सलामीला आल्यानंतर शतक ठोकले होते. सिडनी सिक्सर्स संघासाठी काही सामन्यांमध्ये त्याचे प्रदर्शन जबरदस्त राहिले होते.
सोमवारी (7 ऑगस्ट) दक्षिण आफ्रिका दौरा, भारत दौरा आणि त्याचसोबत आगामी वनडे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली गेली. त्याचसोबत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही संघ घोषित केला गेला, ज्याचे नेतृत्व मिचेल मार्श करणार आहे. यावेळी जॉर्ज बेली यांनी स्मिथविषयी सांगितले की, “तो दक्षिण आफ्रिकेमध्ये सलामीवीर म्हणून खेळेल. मला वाटते स्मिथ त्या मल्टी-फॉरमॅट खेळाडूंपैकी एक आहे, जे यासाठी तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याला संधी देऊ इच्छित आहे.” (Steve Smith will play as an opener for the Australian T20 team)
महत्वाच्या बातम्या –
‘आमच्या रोहितला दाखवलंच नाही, सगळीकडे विराटच…’, Asia Cupच्या प्रोमोवर ‘हिटमॅन’च्या चाहत्यांची आगपाखड
मिशन वर्ल्डकपला प्रारंभ! ‘या’ 19 जणांतून निवडणार अंतिम 15, यादिवशी होणार संघाची घोषणा