आज इंटरनॅशनल क्रिकेट फॅब फोर निवडायला गेले, तर विराट कोहली, जो रूट, केन विलियम्सन यांच्यासोबत चौथे नाव येते ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचे. स्टीव स्मिथ म्हणजे बॅटिंगमधील असा अवलिया, जो जगात कोणत्याही कोपऱ्यात गेला तरी आपल्या बॅटिंगने नेहमीच प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः नामोहरम करून टाकतो. एकदा स्मिथ पिचवर चिकटला की, तुमचे असतील नसतील ते प्लॅन आणि तुमचे कसब सगळं काही फेल ठरतं. कॅप्टन म्हणूनही हा स्मिथ धुरंधरच, पण तुम्हाला माहित आहे का, या स्मिथची पहिल्यांदा पारख करणारा आपला ‘दादा’ सौरव गांगुली होता. होय, सौरव गांगुलीच. आता त्याचा किस्सा आम्ही घेऊन आलो आहोत.
सन २००९-२०१०च्या ऑस्ट्रेलियन समरमध्ये स्टीव्ह स्मिथ नाव चांगलंच गाजत होतं. खरं तर शेन वॉर्नचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. खुद्द वॉर्नलाही तो आवडायचा. त्यानं त्यावर्षी ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये डेब्यूही केला, पण परफॉर्मेंस म्हणावा असा नव्हता. पुढचं वर्ष तर दुखापतीतच गेलं. हा खरंच लंबी रेस का घोडा आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला होता.
हेही पाहा- फक्त गांगुलीमुळे स्टिवन स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन झाला
स्टीव स्मिथ हे नाव सगळ्यांच्या नजरेत आलं २०१२च्या आयपीएलमधून. नवी फ्रँचाइजी पुणे वॉरियर्स इंडिया त्यावेळी बीसीसीआयशी काही मुद्द्यावर भांडत होती. अखेर बराच काथ्याकूट झाल्यावर त्यांनी आयपीएल २०१२ खेळायचं ठरवलं. त्या टीममध्ये स्मिथला जागा मिळालेली. खरं तर आयपीएल कॅम्पमध्ये यायची ही त्याची काही पहिली वेळ नव्हती. २०१०ला तो आख्खा सिझन आरसीबीच्या बेंचवर बसून होता. पुढच्या वर्षी कोचीने त्याला विकत घेतले खरे, पण दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. अशात पुण्यात त्याला चान्स भेटेल का नाही याबाबत प्रश्नचिन्ह होतं.
खरं तर त्यावर्षी पुण्याच्या टीमने काही कारणांमुळे आयपीएल लिलावात भागच घेतला नव्हता. तरीही एक तगडी टीम बनवण्यात यांना यश आलेलं. मागच्या वर्षी आशिष नेहराचा रिप्लेसमेंट म्हणून आलेला द सौरव गांगुली कॅप्टन बनलेला. इंटरनॅशनल स्टार मायकल क्लार्क, ऍंजेलो मॅथ्यूज, जेसी रायडर, मार्लन सॅम्युअल्सहे देखील संघात होते, तरीही उणीव भासणार होते नियमित कॅप्टन युवराज सिंगची. युवराज त्यावर्षी कॅन्सरमधून सावरत होता.
याच रथी-महारथींच्या टीममध्ये स्मिथ होता. खरं तर स्मिथ तोपर्यंत ऑस्ट्रेलिया टीममध्ये पर्मनंट झाला नव्हता, पण आदल्या वर्षी भारतातच चॅंपियन्स लीग खेळताना गांगुलीने त्याला पाहिलेलं. खरं तर त्याच्या बॉलिंगसाठी नव्हे, तर बॅटिंगसाठी गांगुलीने तिथेच ठरवलं, ‘काहीपण करून हे जनावर आपल्या गोठ्यात पाहिजे.’
स्मिथ गांगुलीच्या मार्गदर्शनात खेळू लागला, पण त्याच्या एका कलाकारीने अक्षरशः त्याला घराघरात पोहोचवले. केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये मुरली कार्तिकच्या बॉलिंगवर युसूफ पठाणने लॉंग ऑनला असा शॉट मारला, जो फिक्स सिक्सच जाणार असं सगळ्यांना वाटलं, पण तिथे होता स्टीव्ह स्मिथ. आधी जवळपास दहा मीटर धावत येऊन त्याने अशी काही हनुमान उडी मारली की, जमिनीपासून पाच-सहा फूट तो हवेत होता. त्याने सिक्समध्ये चाललेला बॉल ग्राउंडमध्ये टाकला. असं चित्र क्रिकेटच्या मैदानावर दिसलंच नव्हतं. तिथून पुढे असे हजारो सेव्ह आले, पण तो सेव्ह आयकॉनिक आणि ट्रेंड सेटर ठरला.
दादाचा स्मिथवर किती विश्वास होता याचं आणखी एक उदाहरण म्हणजे, जेव्हा दादा एका मॅचला खेळू शकणार नव्हता, तेव्हा त्याने सरळ या २२ वर्षाच्या स्मिथला कॅप्टन बनवलं. तेही मायकल क्लार्कसारखा ऑस्ट्रेलियाचा करंट कॅप्टन संघात असताना. स्मिथने त्याआधी न्यू साउथ वेल्सची कॅप्टन्सी केली होती, पण तू इंटरनॅशनल कॅप्टन होऊ शकतो हा कॉन्फिडन्स दादानच त्याला दिला. पुढे, लेगस्पिनर असलेला स्मिथ जगातील महान बॅटर बनला, ऑस्ट्रेलियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये लीड केलं, आयपीएलमध्ये पुण्याला फायनलपर्यंत नेलं. ते लाजिरवाणं सॅंडपेपर कांडही झालं, पण स्मिथ कॅप्टन म्हणून ग्रेट होणार, हा दादाचा विश्वासही खराच ठरला, अगदी नेहमीप्रमाणे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! सौरव गांगुलीने सोडले बीसीसीआयचे अध्यक्षपद? ट्विटरवरून दिले संकेत