आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या गोलंदाजीने सर्वजण प्रभावित झाल्याचे दिसत आहे आणि त्यात इंग्लंडचा आघाडीचा खेळाडू बेन स्टोक्सचे नावही जोडले गेले आहे. बेन स्टोक्सने मोहम्मद शमीच्या विकेट घेण्याच्या क्षमतेचे कौतुक केले आणि त्याला सध्याच्या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज देखील म्हटले.
मोहम्मद शमी (Mohammad Shami) याला भारताने पहिल्या चार सामन्यांमध्ये खेळवले नाही. मात्र, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला दुखापत झाल्यानंतरत्याला संघात घेणे भाग पडले आणि सूर्यकुमार यादवसह मोहम्मद शमीनेही प्लेइंग ११ मध्ये जागा मिळवली. अवघ्या तीन सामन्यांत त्याने 14 विकेट्स घेतल्या आहेत. शमीने आपल्या पहिल्याच सामन्यात धडाका लावला आणि न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध चार विकेट्स घेतल्या.
गुरुवारी (2 नोव्हेंबर) श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद शमीने अवघ्या 5 षटकांत 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. आणि तो सामनावीर ठरला. या सामन्यात त्याने भारतासाठी एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याचा पराक्रमही केला. त्याच्या नावावर आता 45 विकेट्स आहेत, तर झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांच्या नावावर 44-44 विकेट्स आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी स्टोक्सला शमीच्या श्रीलंकेविरुद्धच्या शानदार स्पेलबद्दल विचारण्यात आले होते. इंग्लिश खेळाडूने भारतीय वेगवान गोलंदाजाचे खूप कौतुक केले. तो म्हणाला, “शमीविरुद्ध मी खूप क्रिकेट खेळलो आहे, तो एक उत्तम गोलंदाज आहे. मला वाटते की, तो नक्कीच विश्वचषकाचा गोलंदाज आहे. मला वाटत नाही की तो प्रत्येक सामना खेळला आहे पण तो ज्या प्रकारे खेळला आहे, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक सामन्यात त्याने घेतलेल्या विकेट्सची संख्या अविश्वसनीय आहे. त्याने विकेट्स मिळवण्याचा एक मार्ग शोधला आहे.”
विश्वचषक 2023 मधील भारताचा पुढील सामना 5 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणार आहे. या विश्वचषकात भारताने 7 सामने खेळले आहेत त्यातील सातही सामने भारताने जिंकले आहेत. भारत 14 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी विराजमान आहे. (Stokes impressed with Shami bowling says He definitely World Cup)
म्हत्वाच्या बातम्या
हश्मतुल्ला शहीदीकडून नेदरलँड्सवरील विजय ‘यांना’ समर्पित, उपांत्य फेरीबद्दलही केलं मोठं वक्तव्य
“हा मूर्खपणा करून तुम्ही आमचीही लाज काढताय”, अक्रमने पाकिस्तानी दिग्गजाला चांगलंच झापलं