सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. हा सामना सुरु असतानाच एक व्यक्ती मैदानात आला होता. यावेळी त्याच्या हातात एक बोर्ड होता. तो क्वीन्सलँडमधील वादग्रस्त खाण प्रकल्पासाठी अडाणी ग्रुपला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याच्या निषेधार्थ मैदानात आला होता.
हा सामना सुरु होण्याआधी देखील या मैदानावर सुमारे ५० निदर्शकांच्या गटाने अडाणी ग्रुपला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याच्या निषेधार्थ आपली उपस्थिती स्पष्ट केली होती. ते ड्रायव्हर ऍव्हेन्यूच्या बाहेरच जमा झाले होते.
नक्की काय आहे प्रकरण –
क्विन्सलँड येथे अडाणी ग्रुपचा खाण प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पासाठी भारतीय स्टेट बँकेने १ अब्ज डॉलर्सचे कर्ज अडाणी ग्रुपला देण्याचे मान्य केले आहे. मात्र पर्यावरण संवर्धानाच्या दृष्टीने या प्रकल्पाला ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. भारतीय स्टेट बँकेने १ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याच्या निषेधार्ध अंदोलनेही ऑस्ट्रेलियात झाली आहेत.
https://twitter.com/stopadani/status/1332155313294741504
सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह –
कोरोनाच्या संकटकाळात या मालिका होत आहेत. त्यातही ५० टक्के प्रेक्षकांना सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही एक चाहता मैदानात आल्याने अनेकांनी सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
या सामन्यातून भारतीय संघाने कोरोनाच्या संकटानंतर जवळपास ७ महिन्यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पंचहजारी फिंच! भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात केला खास विक्रम
कहर! पहिल्या वनडे सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया संघ चक्क अनवाणी पायांनी मैदानात
पहिल्या वनेडत नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय, शिखरबरोबर ‘हा’ खेळाडू येणार सलामीला
ट्रेंडिंग लेख –
‘बर्थडे बॉय’ सुरेश रैनाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
क्रिकेटमध्ये ६ वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना ज्यामुळे हेलावले होते क्रिकेट जगत
…म्हणून सुरेश रैना आहे जगातील सर्वात दिलदार व निस्वार्थी क्रिकेटर