शेन वॉर्न इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर झाला होता. ब्रॅड हॉगचेही वय झालेले. ऑस्ट्रेलियाच्या स्पीन डिपार्टमेंटचा पुढचा लीडर कोण?. असा प्रश्न विचारला जाऊ लागलेला. अनेकजण जेसन क्रेझाच नाव घेत होते, पण वॉर्नची काही वर्षांपूर्वीच एका स्पिनरवर नजर पडलेली. तसा तर तो प्लेअर होता ऑलराऊंडर पण, वॉर्नला वाटायचे हा चांगला स्पिनर होईल. कदाचित वॉर्नीची ही पहिली अशी भविष्यवाणी असेल, जी खरी ठरली नाही. तो प्लेयर चांगला स्पिनर नाही बनला पण, द मायटी ऑस्ट्रेलियन्सचा कॅप्टन व्हायचं नशीब त्याला लाभलं. तो होता कॅमेरुन व्हाईट.
ज्यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा गोल्डन पिरेड सुरू झाला होता, त्याच वेळी व्हाईटनं प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. साल असेल १९९५-१९९६. वय १४-१५. तसं तर तो लहानपणापासूनच क्रिकेटप्रेमी होता आणि क्रिकेटमध्येच करिअर करायचं त्याचं फिक्स होतं. अवघ्या १७ व्या वर्षी लेग स्पिनर म्हणून फर्स्ट क्लास करियरची सुरुवात त्याने केली. आपल्या लेग स्पिननं चार विकेट घेत त्याने डेब्यू गाजवला. कदाचित इथेच वॉर्नला तो आपला वारसदार वाटलेला.
पुढे २००२ ला अंडर नाईन्टीन वर्ल्डकप खेळला गेला आणि व्हाईट ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बनला. खरंतर त्या वेळी सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचेच राज्य होते. वनडे, टेस्ट, वुमेन्स क्रिकेट, मेन्स क्रिकेट सगळीकडेच. ते फक्त अंडर नाईन्टीन वर्ल्डकपचे डिफेंडींग चॅम्पियन नव्हते. व्हाईटने ती जबाबदारी घेतली. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणत त्याने स्वतः चारशेहून जास्त रनांचा पाऊस पाडत ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याच संघातील ७ प्लेअर पुढे ऑस्ट्रेलियासाठी खेळले. जॉर्ज बेली, डॅन ख्रिस्टीयन, शॉन मार्श, जेवियर डोहर्टी त्यापैकीच.
अंडर नाईन्टीन वर्ल्डकप जिंकल्यावर खरं बक्षीस त्याला लवकरच मिळाल. आपल्या मुंबईचा जसा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दबदबा आहे, तसा दबदबा ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरियाचा. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्याला या टीमचा कॅप्टन व्हायची संधी मिळाली.
कंसिस्टंट परफॉर्मन्स केलेल्या व्हाईटला ऑस्ट्रेलियाकडून डेब्यू करायची संधी मिळाली, पण भूमिका होतील लेग स्पिनरची. मात्र, हळूहळू स्पिनर सोडून तो हार्ड हिटींग बॅटर आणि फिनिशर बनला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये त्याला बीअर नावानं ओळखलं जाऊ लागलं. त्याचं कारण होतं एक तर तो नावाप्रमाणेच व्हाईट होता, उंची होती आणि भरपूर वजनही होतं. ध्रुवीय अस्वलांसारखा वाटतो म्हणून त्याला बिअर हे नाव पडलं.
ज्यावेळी आयपीएल सुरू झाली त्यावेळी ऑस्ट्रेलियन प्लेयर्सला चांगली मागणी होती. २४ वर्षाचा व्हाईट पहिल्या सिझनला आरसीबीचा भाग बनला. आयपीएलच्या फर्स्ट एवर मॅचला फक्त दोन ऑस्ट्रेलियन ग्राउंडवर होते. एक केकेआरसाठी रिकी पॉंटिंग आणि दुसरा आरसीबीसाठी कॅमेरून व्हाईट. पहिली तीन वर्ष त्याला आरसीबीने नियमित संधी दिली. कारण परफॉर्मन्ससही तसाच होता.
पुढे २०११ ला त्याला अशी संधी मिळाली जिच्यासाठी प्रत्येक खेळाडू आपलं आयुष्य लावत असतो. आपल्या देशाचं नेतृत्व करण्याची संधी. २०११ ला मायकल क्लार्कच्या अनुपस्थित ऑस्ट्रेलियाला वनडेत लीड केलं. पुढे त्याला ऑस्ट्रेलियाचा परमनंट टी२० कॅप्टनही बनवलं गेलं, पण खराब फॉर्मन त्याची संघातील जागा आणि कॅप्टनपद दोन्ही गेलं. त्याच्या जागी एकेकाळी त्याचाच ज्युनिअर असलेल्या जॉर्ज बेलीला कॅप्टन बनवलं गेलं, आणि त्याने चार वर्ष ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.
आयपीएलमध्ये व्हाईटने नेहमी लक्षात राहील असा परफॉर्मन्स कधीच दिला नाही, पण तो नेहमी संघांची फर्स्ट चॉइस होता. २०११ला दुसरा सर्वात महागडा ऑस्ट्रेलियन ठरलेल्या व्हाईटला डेक्कन चार्जर्सने व्हाईस कॅप्टन बनवलेल. पुढची तीन वर्षे तो त्यांच्यासाठीच खेळला आणि कॅप्टनही बनला. बिग बॅशमध्ये आणि व्हिक्टोरियासाठी तो खेळत राहिला. अखेर २०२० ला त्याने क्रिकेटर म्हणून थांबायचा निर्णय घेतला.
व्हाईटमध्ये खरेच अफाट प्रतिभा होती, पण त्याच्यानंतर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पीढीसमोर ती पुरेशी ठरली नाही, तरीही एक लक्षात राहणार करियर व्हाईटच राहीले, यात कोणतीच शंका नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याही संयमाचा बांध, भलताच झालेला ‘अँग्री यंग मॅन’