---Advertisement---

…म्हणून ब्रिस्बेन कसोटीतून पदार्पण केलेल्या त्या भारतीय खेळाडूचे नाव आहे ‘वॉशिंग्टन’!

On: शुक्रवार, जानेवारी 15, 2021 12:53 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(१५ जानेवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. या सामन्यातून भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन या खेळाडूंनी पदार्पण केले आहे. त्यातील सुंदरच्या ‘वॉशिंग्टन’ या नावाचे सर्वांनाच आत्तापर्यंत आश्चर्य वाटत आले आहे. कारण हे नाव पाश्चात्य देशातील असल्याने ते एका भारतीय मुलाला कसे मिळाले, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र काही वर्षांपूर्वी त्याच्या वॉशिंग्टन नावामागचा इतिहास त्याच्या वडिलांनी सांगितला होता.

ते द हिंदूला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते, ” मी हिंदू आहे आणि मी एका चांगल्या कुटुंबातून आलो आहे. माझ्या घरापासून दोन रस्ते सोडून ट्रीपलिकेनमध्ये एक माजी सैनिक राहत होते. त्यांचे नाव पीडी वॉशिंग्टन असे होते. त्यांना क्रिकेट फार आवडायचे. ते आम्हाला खेळताना बघण्यासाठी मरिना मैदानावर यायचे. त्यांना माझा खेळ आवडायचा.”

ते पुढे म्हणाले होते, ” मी गरीब होतो. ते मला गणवेश घेऊन द्यायचे, माझी शाळेची फी भरायचे, मला पुस्तके घेऊन द्यायचे, त्यांच्या सायकलवर मला मैदानावर घेऊन जायचे, तसेच मला प्रेरणा द्यायचे.”

वॉशिंग्टन सुंदरचे वडीलही क्रिकेटपटू होते. त्यांच्यासाठी माजी सैनिक वॉशिंग्टन सर्व काही होते.

त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव वॉशिंग्टन ठेवल्याचे सांगतले होते. ते म्हणाले होते, ” माझ्या पत्नीला मुलाच्या जन्माच्या वेळी खूप त्रास झाला होता पण बाळ बचावले. हिंदू रीतीप्रमाणे मी देवाचा धावा केला होता. मी माझ्या मुलाचे नाव श्रीनिवासन ठेवले होते. पण नंतर मी त्याचे नाव वॉशिंग्टन ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्या व्यक्तीने माझ्यासाठी इतके काही केले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी हे नाव ठेवले.”

वॉशिंग्टन सुंदर याआधी तामिळनाडूकडून रणजी ट्रॉफीत खेळला आहे. तिथेही त्याने चांगली कामगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

जबदस्त इच्छाशक्ती! एका कानाने ऐकू येत नसतानाही भारताकडून कसोटी खेळण्याचं स्वप्न केलंय पूर्ण

एक दोन नव्हे तर तब्बल ५ भारतीय खेळाडूंनी एकाच मालिकेतून केलंय पदार्पण, यापूर्वी असं ‘तेव्हा’ घडलं होतं..

टीम इंडीयाचं दुखापतीचं ग्रहण संपेना! चालू सामन्यात जायबंदी झाल्याने ‘हा’ प्रमुख गोलंदाज मैदानाबाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment