---Advertisement---

कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा मुंबईकर ‘निलेश कुलकर्णी’

On: रविवार, एप्रिल 3, 2022 10:28 AM
---Advertisement---

आपल्या देशासाठी क्रिकेट खेळणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याचा पदार्पणाचा सामना खूप महत्वाचा असतो. प्रत्येक खेळाडू पदार्पण सामन्यात स्वत: ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या सामन्यातच काही खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत नाव कमावतात. तर काहींचे पदार्पण निराशजनक राहते. मात्र, क्रिकेटविश्वात असे काही क्रिकेटपटू आले आहेत ज्यांचे पदार्पण खूप संस्मरणीय राहिले. परंतु, दुर्दैवाने त्यांनानंतर म्हणावी तशी ओळख मिळाली नाही. अशाच खेळाडूंपैकी एक भारतीय खेळाडू म्हणजे निलेश कुलकर्णी.

सचिनच्या नेतृत्वात केली होती कामगिरी
निलेश कुलकर्णी हा भारताचा एकमेव क्रिकेटपटू आहे ,ज्याला त्याच्या कसोटी कारकीर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेण्याचा बहुमान मिळाला आहे. १९९७ मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात निलेश कुलकर्णीने कोलंबो कसोटीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

पहिल्याच कसोटी सामन्यात निलेशने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज मर्वान अटापट्टूला बाद करून विक्रम केला होता. निलेश कसोटी कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आतापर्यंत त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही हा अनोखा पराक्रम करू शकला नाही.

कोलंबो कसोटी सामना तोच सामना होता, ज्यामध्ये, श्रीलंकेने शानदार फलंदाजी केली आणि एकाच डावात ९५६ धावा केल्या. या सामन्यात सनथ जयसूर्याने ३४० धावांची खेळी केली होती.

निलेश कुलकर्णी यांची कारकीर्द
कसोटी कारकीर्दीच्या पहिल्या चेंडूवर बळी मिळविल्यानंतरही निलेश कुलकर्णी याचे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोठेतरी हरवले गेले. निलेशची कारकीर्द फार काळ टिकली नाही, त्याने भारताकडून फक्त तीन कसोटी आणि १० वनडे सामने खेळले, कसोटीत दोन आणि वनडे सामन्यात ११ बळी आपल्या नावे केले.

निलेश कुलकर्णी हा भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा २१२ वा खेळाडू होता. कुलकर्णीने आपल्या कारकीर्दीत १०१ प्रथमश्रेणी सामने खेळले. ज्यामध्ये तो ३५७ बळी घेण्यात यशस्वी ठरला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये १३५ तर, टी२० क्रिकेटमध्ये ८ बळी घेण्यात त्याला यश आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच चेंडूवर एकूण २० गोलंदाजांनी बळी मिळवीला आहे. प्रथमता ही कामगिरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम होरानने १८८२-१९८३ मध्ये केली होती. इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात मेलबर्न येथे कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर त्याने बळी घेतलेला. होरेनचा पहिला बळी इंग्लंडचा खेळाडू वॉल्टर रीड हा होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: भारताच्या त्रिशतकवीराने तोडले चहलचे हॅट्रिकचे स्वप्न, पण फिरकीपटूने दाखवली खिलाडूवृत्ती

Video: नुसती निराशा… राजस्थानविरुद्ध रोहित फक्त १० धावा करून बाद, पत्नी रितिकाने मुरडले नाक

DC vs GT | शुबमनची शानदार खेळी अन् फर्ग्युसनचा भेदक मारा, गुजरातचा दिल्लीवर सोपा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---