भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिला सामना झाल्यानंतर आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरीत तीन सामन्यांसाठी कोहली उपलब्ध राहणार नाही. अशात भारतीय संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करताना दिसेल. या सामन्यापूर्वी कोहली आपल्या पालकत्व रजेवर मनमोकळ्यापणाने स्मिथसोबत बोलताना दिसून आला. तो म्हणाला, या खास क्षणासाठी कोणत्याही परिस्थितीत मला तिथे उपस्थित रहायचे आहे.
बीसीसीआयकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली सोबत बसून एकमेकांना प्रश्नोत्तरे विचारताना दिसून येत आहेत. पालकत्व रजेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला, “हा तो निर्णय होता जो माझ्या डोक्यात एकदम स्पष्ट होता. जसे की तुम्ही वचन दिलेले असते, तुम्हाला आपल्या देशासाठी खेळायचे आहे. हा एक खूप-खूप विशेष क्षण आहे. जीवनात काही असे क्षण येतात की, जिथे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी उपस्थित रहायचे असते.”
https://twitter.com/BCCI/status/1339157202976661505
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, “मी खुप उत्सुक आहे की, तो कशाप्रकारे सामोरे जातोय. मला वाटते तो असा माणुस आहे, जो माझ्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळू शकेल.”
क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूंचे म्हणणे आहे की, विराट नसण्याने भारतीय संघाची फलंदाजी खूप कमकुवत होईल. कारण की विराट कोहलीची कामगिरी नेहमीच ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर दमदार राहिली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याच्या जागेवर कोणाला संधी दिली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
विराट कोहलीने 2014 साली कसोटी संघाचे नेतृत्त्व स्विकारले होते, तर 2017 मध्ये मर्यादित षटकांचे प्रतिनिधित्व स्विकारले. विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने मागील ऑस्ट्रेलिया दौर्यात 2-1 ने विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला चौथा धक्का! अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे कर्णधार विराट कोहली रन आऊट?
AUS vs IND Test Live : कोहली धावबाद झाल्यानंतर रहाणेही परतला तंबूत; ८१ षटकात भारत ५ बाद १९६ धावांवर
पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधीच केली होती टीम इंडियाने प्लेइंग XI ची घोषणा; ‘हे’ होते कारण