चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या दुसरा कसोटी सामना चेपॉक स्टेडियम म्हणजे एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने १ बाद ५४ धावा केल्या असून भारत २४९ धावांनी सध्या आघाडीवर आहे. या सामन्यादरम्यान दुसऱ्या दिवसाच्या शेवटी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माच्या जर्सीवरील जीपीएस ट्रॅकर निक वेबर काढताना दिसला होता. त्यामुळे त्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
नक्की का वापरला जातोय जीपीएस ट्रॅकर
निक वेबर हा भारतीय संघाचा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आहे. त्याचा रविवारी (१४ फेब्रुवारी) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाखेर रोहितच्या जर्सीवरील जीपीएस ट्रॅकर काढताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हे जीपीएस ट्रॅकर काय आहे आणि ते क्रिकेटमध्ये का वापरलं जातंय याबाबत चर्चा सुरु झाल्या.
जीपीएस ट्रॅकर चीप खेळाडूंच्या जर्सीला लावली जाते, ज्यामुळे खेळाडूंचा फिटनेस समजतो. याद्वारे खेळाडूंच्या शरीरावर कितपत ताण आहे, याबाबतची योग्य माहिती मिळते. त्यानुसार त्याच्या फिटनेसवर लक्ष देताना सपोर्ट स्टाफला मदत होते. तसेच खेळाडूंना किती आरामाची गरज आहे, तो आणखी कितपत फिट होऊ शकतो. याबद्दलचा सर्व योग्य डेटा सपोर्ट स्टाफला जीपीएस ट्रॅकरमुळे मिळतो.
भारतीय संघाच्या सामन्यांवेळी आणि सरावावेळीही हे जीपीएस ट्रॅकर वापरले जाते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधीपासून भारतीय संघ या जीपीएस ट्रॅकरचा वापर करत आहे. साल २०१९ च्या विश्वचषकावेळी देखील भारतीय खेळाडूंनी जीपीएस ट्रॅकरची मदत घेतली होती. याबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने विश्वासही व्यक्त केला होता. त्यानं म्हटले होते की यामुळे खेळाडूंना त्यांच्या शरीरावरील ताण समजण्यास मदत होते.
तसेच भारतीय संघ हा जीपीएस ट्रॅकर वापरणारा पहिला संघ नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूही त्यांच्या फिटनेससाठी ही युक्ती वापरतात. तसेच फुटबॉलमध्येही ही युक्ती वापरली जाते.
Strength and Conditioning coach Nick Webb removing Rohit's GPS tracker at the end of the day. All the data will be recorded for fitness/preperation. Modern day cricket. #INDvEND #INDvENG #rohitsharma45 pic.twitter.com/cM3U2uiiuy
— Gav Joshi (@Gampa_cricket) February 14, 2021
भारतीय संघाचे दुसऱ्या कसोटीत वर्चस्व –
या सामन्यात भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर संपला. भारताकडून रोहित शर्माने १६१ धावांची दीडशतकी खेळी केली. तर अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतने अर्धशतके केली. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवरच उरकला. त्यांच्याकडून बेन फोक्सने सर्वाधिक नाबाद ४२ धावा केल्या. भारताकडून आर अश्विनने ५ विकेट्स घेतल्या.
यानंतर दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात १८ षटकात १ बाद ५४ धावा केल्या आहेत. भारताकडून रोहित शर्मा २५ धावांवर नाबाद आहे. तर चेतेश्वर पुजारा ७ धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल लिलाव २०२१ : सचिनच्या अर्जुनवर हे तीन संघ लावणार बोली
दुसऱ्या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवत वेस्ट इंडिजचा बांगलादेशला व्हाईटवॉश
इशांत शर्माच्या इनस्विंगरवर रॉरी बर्न्स ठरला अंपायर्स कॉलचा बळी, पाहा व्हिडिओ