मुंबई । सुप्रसिद्ध क्रीडा निवेदिका मयंती लँगर आणि भारतीय अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी यांच्या घरी एक नवीन पाहुणा आला आहे. त्यांनी कुटुंबातील या नवीन सदस्याचे स्वागत केले आहे. मयंती पहिल्यांदा आई झाली. 6 आठवड्यांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला आहे. याची घोषणा तिने स्वत: सोशल मीडियावर केली आहे. मयंतीने ट्विटरवर नवरा स्टुअर्ट आणि मुलाचा फोटो शेअर केला आहे. यामुळे, इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामात ती निवेदन करताना दिसणार नाही.
तिने लिहिले की,”काही लोकांना कदाचित माहित असेल तर काही लोक अनुमान लावत आहेत. स्टार स्पोर्ट्स गेली पाच वर्षे माझ्या कुटुंबासारखे आहे. त्यांनी गर्भवती असताना मला खरोखर साथ दिली. मी गर्भवती होते तरीही आयपीएलमध्ये काम करत राहू इच्छित होते, पण त्यानंतर आयपीएलची वेळ वाढविण्यात आली. स्टुअर्ट आणि मी जवळजवळ सहा आठवड्यांपूर्वी आमच्या मुलाचे स्वागत केले.”
So I’m going to love watching the IPL @StarSportsIndia all the best to the team 😁 @jatinsapru @suhailchandhok @cricketaakash @SanjanaGanesan @ProfDeano @scottbstyris @BrettLee_58 @Sanjog_G and the full gang!! pic.twitter.com/fZVk0NUbTi
— Mayanti Langer Binny (@MayantiLanger_B) September 18, 2020
यासह तिने समालोचन पॅनेलला शुभेच्छा दिल्या. अलीकडेच स्टार स्पोर्ट्सने आपली कॉमेंट्री पॅनल जाहीर केले आहे. या संघात मयंती लँगरच्या जागी ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स अँकर नेरोली मीडोजचा समावेश आहे.19 सप्टेंबर रोजी होणार्या या स्पर्धेत ती पहिल्यांदा युएईमध्ये (अँकरिंग) निवेदन करताना दिसणार आहे.
इंग्रजी कॉमेंट्री टीम:
नेरोली मीडोज, सुरेन संदराम, किरा नारायणन, नशप्रीत कौर, तान्या पुरोहित, धीरज जुनेजा, संजना गणेशन, जतिन सप्रू, सुहेल चांदोक आणि अनंत त्यागी.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी
पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश
ट्रेंडिंग लेख –
“नवा बोथम” म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफ विषयी १० रंजक गोष्टी
‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार
हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन