ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेला प्रारंभ झाला आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला. तर, दुसरा कसोटी सामना ऍडीलेडमध्ये सुरू आहे. या सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
स्टुअर्ट ब्रॉड याने जेव्हा आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, त्यावेळी सुरुवातीच्या काळात त्याला युवराज सिंगने एकाच षटकात सलग सहा षटकार मारले होते. त्यानंतर त्याची कारकीर्द किती काळ टिकेल असे प्रश्न देखील उपस्थित होऊ लागले होते. परंतु, गेल्या काही वर्षांत त्याने आपल्या गोलंदाजीचा स्तर उंचावला. सध्या तो इंग्लंड संघातील सर्वात प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील १५० वा सामना आहे.
आपल्या देशासाठी १५० कसोटी सामने खेळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. ब्रॉड १५० कसोटी सामने खेळणारा जगातील १० वा खेळाडू ठरला आहे, तर इंग्लंडचा तिसरा खेळाडू ठरला आहे. इतकेच नाही, तर १५० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या १० क्रिकेटपटूंमध्ये केवळ २ वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. हे दोन गोलंदाज म्हणजे जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड. विशेष म्हणजे ब्रॉडला १५० व्या कसोटी सामन्याची कॅप अँडरसनने प्रदान केली.
सध्या सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामने खेळले होते, तर स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग यांनी १६८ कसोटी सामने खेळले होते. तसेच जेम्स अँडरसनने १६७ सामने खेळले आहेत. तर जॅक कॅलिसने १६६, राहुल द्रविडने १६४ आणि ॲलिस्टर कूकने १६१ सामने खेळले आहेत.
Congratulations on an incredible achievement, @StuartBroad8! ????#Ashes | ???????? #AUSvENG ???????????????????????????? pic.twitter.com/ySqWgT2Dcb
— England Cricket (@englandcricket) December 16, 2021
सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू
२०० सामने – सचिन तेंडुलकर (भारत )
१६८ सामने – स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
१६७ सामने – जेम्स अँडरसन (इंग्लंड)*
१६६ सामने – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
१६४ सामने – राहुल द्रविड (भारत), शिवनारायण चंदरपॉल (वेस्ट इंडिज)
१६१ सामने – ॲलिस्टर कूक (इंग्लंड)
१५६ सामने – ॲलेन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
१५० सामने – स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)*
महत्त्वाच्या बातम्या –
‘दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे ध्येय’, कर्णधार विराट कोहलीचा निर्धार
अफगाणिस्तान २०१८ नंतर येणार भारतीय दौऱ्यावर, असे आहे संपूर्ण वेळापत्रक
मुंबई टू दक्षिण आफ्रिका!! भारतीय संघातील खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना, फोटो व्हायरल






