इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर ब्रॉड याने शनिवार (29 जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ओव्हल कसोटी हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना असणार आहे. ब्रॉड सामन्याच्या चौथ्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. ब्रॉड मैदानावर येताच ऑस्ट्रेलिया संघाकडून त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. या इंग्लिश दिग्गजाने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत सर्वांचे लक्ष वेधले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी ऍशेस कसोटी सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळली जात आहे. या सामन्याच्या तीसऱ्या दिवशी स्टुअर ब्रॉड (Stuart Broad) 2 धावांसह नाबाद होता. इंग्लड संघाने आपल्या चौथ्या दिवशीच्या खेळात फक्त 6 धावा केल्या. या 6 धावा ब्रॉडच्याच बॅटमधून निघाल्या. कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर ब्रॉडला षटकार मारता आला, यासाठी सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 81व्या षटकात मिचेल मार्श गोलंदाजी करत होता, ज्याला ब्रॉडने हा षटकार मारला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CvUW88wt-ye/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
ब्रॉड आपल्या शेवटच्या सामन्यात नाबाद राहीला. मात्र, त्याच्या सोबत असलेला जेम्स अँडरसन सामन्याच्या चौथ्या दिवशी एकही धाव न करता बाद झाला. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात 81.5 षटकांमध्ये 384 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 385 धावांची आव्हान दिले. तत्पूर्वी, ब्रॉडने ओव्हल कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर निवृत्तीबाबत घोषणा केली होती. माध्यमांसमोर तो म्हणाला, “मी याचा खूप विचार केला, मला शुक्रवार पर्यंत कळत नव्हते की मी काय करु. पण मी बेन स्टोक्स (Ben Stoks) याच्याशी चर्चा केल्यानंतर बरे वाटले आणि मी निर्णय घेतला. मी माझ्या क्रिकेट जिवणात चांगली कामगिरी केली. याचा मला आनंद आहे.”
स्टुअर ब्रॉडची कारकीर्द
ब्रॉडला क्रिकेटमध्ये जवळपास 17 वर्षे झाले. या दिर्घकाळात त्याने अनेक पराक्रम केले आहेत. ब्रॉड कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 167 सामन्यात 602 विकेट्स घेतले आहेत. कसोटीत 600 विकेट्स घेणारा तो केवळ दुसरा वेगवान गोलंदाज आहे. ब्रॉड ऍशस मालिकेतल इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. या मालिकेत त्याने 150 विकेट्स नावावर केल्या आहेत. (stuart-broad-last-time-batting-he-hit-the-six)
महत्वाच्या बातम्या:
गावसकरांनंतर कपिलचाही भारताच्या खेळाडूंवर निशाणा, पैशांचा उल्लेख करत म्हणाले…
एअर होस्टेसनं पार केली हद्द! धोनी झोपेत असताना काढला व्हिडिओ, चाहत्यांचा आक्षेप