---Advertisement---

५०० विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीबद्दल केले मोठे भाष्य, म्हणतो अजून काही…

On: बुधवार, जुलै 29, 2020 2:59 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडलेले क्रिकेट क्षेत्र चार महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा नव्याने सुरु झाले आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील कसोटी मालिकेने याची सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, काल (२८ जुलै) दोन्ही संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध साउथम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात संघाबाहेर असलेल्या ३४ वर्षीय स्टुअर्टने शानदार पुनरागमन केले. तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स घेत स्टुअर्ट हा कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स घेणारा जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे. आपल्या भविष्याविषयी बोलताना स्टुअर्ट म्हणाला की, “माझ्यामध्ये आणि माझा संघसहकारी वेगवान गोलंदाज जिम्मी अँडरसनमध्ये अजूनही ‘काही षटके बाकी’ आहेत.”

स्काय स्पोर्ट्सशी बोलताना स्टुअर्ट म्हणाला की, “आपण सामन्यात जी मेहनत करतो, ती आपल्या सवयीप्रमाणे असते आणि ही मेहनतच आपल्याला सामन्यात विजय मिळवून देते. कारकिर्दीत येणाऱ्या चढ-उतारांमध्येही मिळालेला विजय खूप आनंद देणारा असतो. अंडरसनने इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक ५८९ विकेट्स घेतले आहेत. त्याच्यानंतर स्टुअर्टचा दूसरा क्रमांक लागतो. याविषयी बोलताना स्टुअर्ट म्हणाला की, आम्हाला दोघांना एकमेकांसोबत गोलंदाजी करायला खूप मजा येते. मला वाटते की आमच्यामध्ये अजूनही काही षटके शिल्लक आहेत.”

२०१७मध्ये अंडरसनने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील ५०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटला बाद करत त्याने हा विक्रम केला होता. विशेष म्हणजे, मॅन्चेस्टर येथे झालेल्या कसोटी सामन्यात स्टुअर्टनेही ब्रेथवेटला बाद करत आपल्या ५०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---