---Advertisement---

‘तो रोबोट हलवणं थांबवा’, गोलंदाजी करताना अचानक ओरडला स्टुअर्ट ब्रॉड, पाहा नक्की काय झालं

On: शनिवार, जानेवारी 15, 2022 11:37 PM
Stuart Broad
---Advertisement---

होबार्ट। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ऍशेस मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे झाला. दिवस-रात्र स्वरुपातील या सामन्यात देखील दुसऱ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून आले. पण असे असले तरी, स्टुअर्ट ब्रॉडच्या एका कृतीची या सामन्यादरम्यान बरीच चर्चा झाली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

झाले असे की, शनिवारी (१५ जानेवारी) या सामन्याचा दुसरा दिवस होता. या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना ६३ व्या षटकात इंग्लंडचा ३५ वर्षी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजीला आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि ऍलेक्स कॅरी फलंदाजी करत होते.

यावेळी षटकाचा अखेरचा चेंडू टाकण्यासाठी ब्रॉडने रन-अप घेतला, पण तो चेंडू टाकण्याआधीच तो थांबला आणि काहीसे वैतागून जोरात म्हणाला, ‘तो रोबोट हलवणे बंद करा’. त्याला असं ओरडताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण तो ओरडला कारण फलंदाजी करणाऱ्या मिशेल स्टार्कच्या मागे कॅमेरा होता, ज्यामुळे ब्रॉडचे लक्ष विचलित होत होते. या घटनेचा व्हिडिओ क्रिकेट डॉट कॉम एयू या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

ब्रॉडची शानदार गोलंदाजी
इंग्लंडची कामगिरी ऍशेस २०२१-२२ मालिकेत खास झाली नसली तरी ब्रॉड चांगल्या लयीत खेळताना दिसत आहे. त्याने होबार्ट कसोटीतील पहिल्या डावातही शानदार गोलंदाजी करताना ३ विकेट्से घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावात देखील त्याने दुसऱ्या दिवसाखेर १ विकेट घेतली आहे. त्याने याआधी चौथ्या कसोटीत पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या.

अधिक वाचा – ब्रॉड बनला ‘अव्वल नंबरी’! ऍशेस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले स्वतःचे नाव

ब्रॉड हा इंग्लंडचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत १५० हून अधिक कसोटी सामने खेळताना ५३० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

व्हिडिओ पाहा – बेधडकपणे खेळणाऱ्या पंतबद्दल या गोष्टी नक्कीच माहित नसतील

होबार्ट कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
होबार्ट कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ३०३ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने १८८ धावांवर रोखत ११५ धावांची आघाडी मिळवली. पण, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी बरी झालेली नाही. त्यांनी दुसऱ्या दिवसाखेर १९ षटकात ३७ धावांवर ३ विकेट्स गमावल्या आहेत. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया १५२ धावांनी आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय क्रिकेटचा ‘राजकुमार’ विराट! मात्र, नेतृत्व सोडताना नेहमीच झाली अवहेलना

‘माझ्यासाठी हा दुःखदायक दिवस’, विराटच्या तडकाफडकी निर्णयानंतर रवी शास्त्रींची भावूक पोस्ट चर्चेत

पीकेएलमध्ये शनिवारी रंगला ‘ट्रिपल पंगा’! दिल्ली, युपीचे विजय; मुंबा-बंगाल यांच्यात थरारक टाय

बेधडकपणे खेळणाऱ्या पंतबद्दल या गोष्टी नक्कीच माहित नसतील| Rishabh Pant Facts

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---