Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय क्रिकेटचा ‘राजकुमार’ विराट! मात्र, नेतृत्व सोडताना नेहमीच झाली अवहेलना

January 15, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
virat kohli

Photo Courtesy: Twitter/Virat Kohli


भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेली सात वर्ष सातत्याने भारतीय संघाची धुरा वाहणारा विराट आता केवळ फलंदाज म्हणून भारतीय क्रिकेटसाठी आपले योगदान देईल. भारतात आजवरचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरलेल्या विराटसाठी तिनही वेळी कर्णधारपद सोडताना वाद निर्माण झाला. आपण त्याच वादांचा मागोवा घेऊया.

टी२० कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय
विराट कोहलीने १६ सप्टेंबर २०२१ रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून टी२० कर्णधारपदावरून निवृत्ती जाहीर केली होती. टी२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीच्या निर्णयाने अनेक दिग्गजांना आश्चर्य वाटले होते. परंतु कोहलीने आपला निर्णय घेतला आणि विश्वचषकानंतर कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्याच्या जागी रोहित शर्माला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले. (Virat Kohli Resign As T20 Captain)

वनडे कर्णधारपद सोडताना झाला वाद
टी२० कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व करणार होता. मात्र, बीसीसीआयला मर्यादित षटकांच्या संघासाठी एकच कर्णधार हवा होता. यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी निवड समितीने मोठा निर्णय घेत विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हिसकावून घेत रोहितची संघाचा नवा वनडे कर्णधार म्हणून नियुक्त केले. (Virat Kohli and BCCI Controversy)

विराट कोहली बीसीसीआयच्या या निर्णयावर खूश नव्हता आणि त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बीसीसीआय आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याविषयी काही खुलासे केले होते. गांगुलीने म्हटले होते की, त्याने वैयक्तिकरित्या विराट कोहलीला टी२० चे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते. मात्र, विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले की, टी२० कर्णधारपद सोडण्यासाठी त्याला बीसीसीआयने कधीही रोखले नाही. त्याला संघाच्या बैठकीत एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्याची माहिती मिळाली होती.

कसोटी कर्णधारपद सोडण्याचा धाडसी निर्णय
त्यानंतर आता कसोटी कर्णधारपद सोडताना विराटने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आघाडीवर असताना कसोटी मालिका भारतीय संघाला गमवावी लागली. या पराभवाला २४ तासांपेक्षाही कमी कालावधी झाला असताना विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा देखील निर्णय घेतला. (Virat Kohli Resign As Test Captain)

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी कर्णधारांतील ‘ध्रुवतारा’ बनला विराट! (mahasports.in)

‘माझ्यासाठी हा दुःखदायक दिवस’, विराटच्या तडकाफडकी निर्णयानंतर रवी शास्त्रींची भावूक पोस्ट चर्चेत (mahasports.in)

विराटने राजीनामा पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या त्या दोन व्यक्ती कोण? का घेतली त्यांची नावे? वाचा सविस्तर (mahasports.in)


Next Post
Stuart Broad

'तो रोबोट हलवणं थांबवा', गोलंदाजी करताना अचानक ओरडला स्टुअर्ट ब्रॉड, पाहा नक्की काय झालं

virat-kohli

कसोटी कर्णधार म्हणून 'मॅरेथॉन' राहिली विराटची कारकीर्द; तब्बल 'इतकी' वर्ष खांद्यावर वाहिली नेतृत्वाची पालखी

ENGLAND-TEST-TEAM

कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने धरले 'या' देशाचे पाय; मदत मागताना म्हटले...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143