क्रिकेटमध्ये अनेक नियम आत्तापर्यंत करण्यात आले आहेत आणि परिस्थितीनुसार अनेकदा काही नियम बदलण्यातही आला आहे. हे सर्व नियम ‘द लॉ ऑफ क्रिकेट’ या पुस्तकात लिहण्यात आले आहे. त्यातील ‘सॉफ्ट सिग्नल’ च्या नियमावरुन मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही या नियमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रॉडने आयसीसीने ‘सॉफ्ट सिग्नल’ नियम काढून टाकावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. अपेक्षेनुसार निर्णय मिळत नसल्याने गोलंदाज म्हणून त्याने हे भाष्य केले आहे. दुसर्या कसोटीतील न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हन कॉनवे यांच्या वादग्रस्त निर्णयानंतर ब्रॉडने हे म्हटले आहे.
ब्रॉडचा असा विश्वास होता की कॉनवेला जॅक क्रॉलीने 22 धावांवर स्लिपमध्ये झेलबाद केले. ऑन-फील्ड अंपायरने हा निर्णय टीव्ही पंच मायकेल गफवर सोडला, ज्यांनी नाबाद घोषित केले. कॉनवेने संधीचा पुरेपूर फायदा उठविला आणि न्यूझीलंडला मजबूत स्थितीत आणण्यासाठी ८० धावा केल्या.
तिसर्या दिवसाच्या खेळापूर्वी ब्रॉडने स्काय स्पोर्ट्सला सांगितले की, ‘मैदानावरील आमच्या प्रतिक्रियेवरून आपण समजू शकतो की तो बाद झाला आहे. जॅकला माहित होते, चेंडू त्याच्या हातात आला आहे. पहिल्या स्लिपमधील जो रूट आणि यष्टीरक्षक जेम्स ब्रासी दोघांनाही वाटले की चेंडू जॅकच्या हातात आलेला आहे. हे दोघेही जॅक पासून एक यार्ड दूर होते.’ तो पुढे म्हणाला ‘यात ४० यार्ड दूर उभ्या असलेल्या पंचांची चुकी नाही, या नियमाने पंचांना कठीण स्तिथीत टाकले आहे.’
स्टुअर्ट ब्रॉडनी आयसीसीला याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले. ‘तुम्ही जर या नियमाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाबींकडे लक्ष दिले तर नकारात्मकता अधिक असते. मला वाटते की हा एक वाईट नियम आहे आणि पुढील बैठकीची वाट न पाहता आयसीसीने ते काढून टाकले पाहिजे.’
स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडसाठी आता पर्यंत १४८ कसोटी सामने खेळले आहे आणि त्यात २.९२ च्या इकॉनॉमिने ५२३ विकेट्स घेतल्या आहे. त्याने इंग्लंडसाठी १२१ एकदिवसीय सामने खेळले आहे आणि त्यात त्याने १७८ विकेट्स घेतल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
दुर्दैव! चालू सामन्यात डू प्लेसिसला झाली गंभीर दुखापत, दवाखान्यात केले गेले भरती
वामिका विराटसारखी दिसते की अनुष्कासारखी? विराटच्या बहिणीने दिले ‘असे’ उत्तर