---Advertisement---

‘त्यावेळी स्टुअर्ट ब्रॉडचे वडील म्हणाले होते, मुलाचे करियर जवळपास संपण्यासाठी धन्यवाद’, युवराजने केला खुलासा

On: रविवार, जून 13, 2021 3:18 AM
---Advertisement---

साल 2007 चा टी20 विश्वचषक म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटला पडलेलं सुरेख स्वप्न होय. वरिष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती, नवखा कर्णधार, अननुभवी खेळाडू, परंतु या हे सर्व गोष्टी असतानाही भारतीय संघाने तो विश्वचषक जिंकून इतिहासात नाव कोरले होते.

या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व जरी महेंद्रसिंग धोनीने केले असले तरी एका खेळाडूने या स्पर्धेत दणका उडून दिला होता आणि तो खेळाडू म्हणजे युवराज सिंग होय. याच विश्वचषकात युवराजने एका षटकात सहा षटकार टोलवले होते. त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड विरुद्ध सहा षटकार मारले होते.

त्यावेळी तो सामना पाहण्याऱ्या प्रेक्षकांच्या मनात ब्रॉडविषयी करुणा जागृत झाली होती, कारण ते ब्रॉडचं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच पहिलच वर्ष होत आणि या सामन्यामुळे त्याच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

या घटनांबद्दल युवराजने बऱ्याच वर्षांनी खुलासा केला की कशा प्रकारे या घटनेवर सामनाधिकारी आणि स्टुअर्ट ब्रॉडचे वडील ख्रिस ब्रॉड यांनी प्रतिक्रिया दिली होती.

उपांत्य सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या वडिलांनी केली चर्चा
युवराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेलेल्या उपांत्य सामन्याचा किस्सा सांगितला. त्याने सांगितलं की ‘त्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडचे वडील ख्रिस ब्रॉड सामनाधिकारी होते, ते माझ्याजवळ आले आणि मला बोलले की, माझ्या मुलाची कारकीर्द जवळ जवळ संपवण्यासाठी धन्यवाद. त्यावेळी युवराजने त्यांना सांगितले की यामध्ये आमच्यात काहीच व्यक्तीगत वाद नव्हते, पंरतू ही गोष्ट पचवणं खरोखर कठीण आहे कारण मी सुद्धा एका षटकात 5 षटकार खाल्ले आहेत.’

या विश्वचषकाच्या महिन्याभर आधी भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर दिमित्रि मस्कारेनेहासने ओव्हलच्या मैदानावर युवराजला शेवटच्या षटकात 30 धावा चोपल्या होत्या. यात तब्बल 5 षटकार त्याने ठोकले होते.

युवराजने ब्रॉडला दिली होती जर्सी
गौरव कपुरसोबत पॉडकस्टमध्ये बोलत असताना युवराजने सांगितले की, त्याने सहा षटकार मारताना जी जर्सी घातली होती, ती जर्सी त्याने स्टुअर्ट ब्रॉडला देऊन टाकली आणि त्यावर लिहिले की, ‘मला माहितीये ही भावना कशी असेल, कारण मी सुद्धा 5 षटकार खाल्ले आहेत. तू इंग्लडचं भविष्य आहे आणि मला विश्वास आहे की तू खूप चांगली कामगिरी करणार आहेस.’ युवराजने सांगितले की बघा आज ब्रॉड कोणत्या ठिकाणी आहे. त्याच्या नावावर 500 कसोटी बळी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

विरेंद्र सेहवाग म्हणतो, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजामधील स्पर्धा पाहण्यास उत्सुक

“उनाडकट मेहनती आणि प्रतिभाशाली खेळाडू, श्रीलंका दौऱ्यासाठी मिळायला हवी होती संधी”, माजी यष्टीरक्षकाचे मत

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी रोहित शर्माला विरेद्र सेहवागने दिला ‘हा’ लाखमोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---