भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. 18 जून रोजी अंतिम सामना होणार आहे. बीसीसीआयने जवळजवळ चार महिन्यांसाठी भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर पाठवले आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबालासुद्धा घेऊन जाण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे. यामुळे विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत साउथॅम्पटन येथे आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वामिका हिचा जन्म याच वर्षी 11 जानेवारी 2021 रोजी झाला. सध्या वामिका पाच महिन्यांची असून विराट आणि अनुष्काने वामिकाची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. त्यामुळेच वामिकाला पाहण्याची चाहत्यांना खूपच उत्सुकता लागलेली आहे. ती नक्की कोणासारखी दिसते? विराट सारखी दिसते की अनुष्का सारखी दिसते? हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.
विराटच्या चाहत्यांनी त्याची बहिण भावना कोहलीला विचारले की, वामिका कोणासारखी दिसते? भावनाने इंस्टाग्रावर प्रश्न-उत्तरांचे सत्र घेतले होते. यादरम्यान भावनाला चाहत्यांनी विचारले की, तुम्ही वामिकाला भेटला आहात. तुमची भाची कोणासारखी दिसते? याचे उत्तर देताना भावना ने लिहिले की, ‘हो मी तिला भेटले आणि आणि ती एक परी आहे.’ यासोबतच प्रेम दाखवणारी ईमोजी पोस्ट केले.
काही दिवसांपूर्वीच इंग्लंड दौऱ्यावर जाताना अनुष्का शर्मा आणि वामिकाला विमानतळावर पाहिले होते. परंतु, या दरम्यान अनुष्काने वामिकाचा चेहरा झाकलेला असल्याने तिची झलक दिसली नाही.
तसेच काही दिवसांपूर्वीच एबी डिविलियर्सची पत्नी डॅनियलने अनुष्कासोबत एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्या दोघींनीही आपल्या मुलींसोबत होत्या. डॅनियल आणि अनुष्का दोघांनीही मास्क आणि फेस शील्ड घातले होते. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सोशल मीडियावरचे सर्वात चर्चेत असणारे सेलिब्रिटी जोडपे आहे. चाहते आणि फॉलोवर्सने जोडीला ‘विरुष्का’ असे नाव दिले.
सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहेत. या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विरेंद्र सेहवाग म्हणतो, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजामधील स्पर्धा पाहण्यास उत्सुक