चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएलमध्ये सातत्याने यश मिळविले आहे. टॉप-४ मध्ये आल्यानंतर सीएसकेचे लक्ष्य हे उपांत्य आणि अंतिम सामन्यात पोहोचण्याचे असते. चेन्नई सुपर किंग्ज संघ आपल्या प्रयत्नात यशस्वीही होतो. या यशामागे एमएस धोनीचा हात असल्याचे राहुल द्रविडने सांगितले आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या वृत्तानुसार, द्रविड एका वेबिनारमध्ये बोलत होता. सीएसकेबाबत बोलताना द्रविड म्हणाला की, “या संघाचे यश पाहिल्यावर समजते की त्यांचा डेटा किती मजबूत आहेत. संघासाठी काम करणाऱ्या लोकांची पोहोचही चांगली आहे. ते खेळाडूंची प्रतिभा समजतात. परंतु संघाकडे एक असा कर्णधार आहे, जो त्यांना चांगल्याप्रकारे समजतो.”
याव्यतिरिक्त द्रविडने हेदेखील म्हटले की, “मी धोनीला चांगल्याप्रकारे ओळखतो. तो डेटा आणि आकडेवारीवर विश्वास ठेवत नाही.”
चेन्नई सुपर किंग्ज यशस्वी संघ
आयपीएलमध्ये जेव्हाही यशस्वी संघांबद्दल चर्चा केली जाते, तेव्हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे नाव आवर्जून घेतले जाते. सीएसके संघाने आतापर्यंत ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. सर्वात विशेष गोष्ट अशी की, हे तिन्ही विजेतेपद सीएसकेने धोनीच्या नेतृत्वात जिंकले आहेत. २ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करत संघाने विजेतेपद जिंकले होते. मागील २ वर्षांपासून सीएसके संघाने सलग अंतिम सामन्यात स्थान मिळविले आहे. यांमध्ये एकदा त्यांना विजय मिळाला, तर एकदा पराभवाचा सामना करावा लागला.
धोनीच्या शानदार नेतृत्वाबद्दल सीएसकेचे खेळाडू नेहमी आपले मत मांडत असतात. फाफ डू प्लेसीस आणि मायकल हसीनेही धोनीची प्रशंसा केली होती. डू प्लेसीस म्हणाला होता की, मला धोनीकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली.
आयपीएलचे आयोजन पुढील महिन्यात १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे. धोनीच्या सीएसके संघाकडून चाहत्यांना यूएईतही खास कामगिरी करण्याची अपेक्षा असेल. सीएसके संघ आयपीएलच्या १३ व्या हंगामावर आपले नाव कोरण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयने बदलले देशांतर्गत क्रिकेटचे नियम, आता कोचिंग करण्यासाठी आहे या वयाची अट
-गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लॉप ठरलेले क्रिकेटर या वेळी होऊ शकतात हिरो
ट्रेंडिंग लेख-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…






