दरवर्षी क्रिकेटप्रेमी एप्रिल-मे महिन्यांची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. अर्थातच त्यांची ही उत्सुकता इंडियन प्रीमिअर लीगसाठी (आयपीएल) असते. परंतु यंदा कोरोना व्हायरसमुळे २९ मार्च रोजी सुरु होणारे आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे, तर १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
एका बाजूला चाहत्यांचा आयपीएल सामने पाहण्याचा उत्साह वेगळा असतो, तर दूसरीकडे भारतीय खेळाडूंबरोबरच परदेशी खेळाडूंचा आयपीएलमध्ये खेळण्याचा उत्साह वेगळाच असतो. कित्येक युवा खेळाडूंना तर त्यांच्या आयपीएलमधील जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर राष्ट्रीय संघात प्रवेश मिळाला आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहरसारखे कित्येक खेळाडू याचे ज्वलंत उदाहरण आहेत.
पण बऱ्याचदा चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू मोठे नाव कमावल्यानंतर काही वेळासाठी चांगले प्रदर्शन करण्यात अयशस्वी ठरताना दिसतो. त्याच्या खराब फॉर्ममुळे आपले १०० टक्के दिल्यानंतरही तो यशाची पायरी चढण्यात अयशस्वी होतो. अशावेळी नव्या हंगामासह तो खेळाडू एक नवी आणि दमदार सुरुवात करण्याच्या प्रतिक्षेत असतो.
या लेखात आयपीएलच्या १२व्या हंगामात आपल्या खराब प्रदर्शनामुळे सुपर डुपर फ्लॉप ठरलेल्या २ खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे. जे आयपीएलच्या १३व्या हंगामात शानदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज असतील. 2 Batsman Who Flopped In IPL Last Year Can Perform Better This Year
तर बघूयात, कोण आहेत ते २ खेळाडू…
पृथ्वी शॉ-
पृथ्वी शॉ या भारतीय खेळाडूचे आयपीएलच्या १२व्या हंगामातील प्रदर्शन चांगले नव्हते. गतवर्षी तो आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. त्याने पूर्ण हंगामात १६ सामने खेळत २२.०६च्या सरासरीने ३५३ धावा केल्या होत्या. शॉच्या या प्रदर्शनाला त्याच्या नावानुसार जास्त चांगले म्हणता येऊ शकत नाही. या हंगामात तो शानदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. त्याच्यामध्ये यापेक्षाही खूप चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.
केन विलियम्सन-
केन विलियम्सनने जेव्हा २०१८मध्ये सनराइजर्स हैद्राबादचे नेतृत्त्व केले होते. तेव्हा संघ केवळ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला नाही, तर विलियम्सनच्या फलंदाजीनेही सर्वांची बोलती बंद केली होती. परंतु आयपीएल २०१९मध्ये त्याची फलंदाजी बिघडली. या हंगामात त्याने जास्त सामनेदेखील खेळले नाहीत. त्याने फक्त ९ सामने खेळत १५६ धावा केल्या होत्या. त्यामुळे निश्चितच विलियम्सन आयपीएल २०२०मध्ये जबरदस्त पुनरागमन करण्याच्या तयारीत असेल.
ट्रेंडिंग लेख –
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…
महत्त्वाच्या बातम्या –
-माजी क्रिकेटर राहुल द्रविड पुन्हा आला टीम इंडियाच्या मदतीला, आता सांभाळणार ही जबाबदारी
-धोनीच्या कोरोना चाचणीबद्दल आले मोठे वृत्त, सीएकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
-हा क्रिकेटर तर चुकून झाला राष्ट्रीय संघाचा कोच, नाहीतर मोहम्मद युसूफच होता लायक