---Advertisement---

IND vs ENG: तिसऱ्या वनडेपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारतीय संघात ‘या’ अष्टपैलू खेळाडूची एन्ट्री

On: शनिवार, जुलै 18, 2026 7:30 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध (IND vs ENG) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) अधिकृत घोषणा करून स्पष्ट केले आहे की, दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) जागी हर्ष दुबेला (Harsh Dubey) टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले. मात्र, त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

हर्ष दुबे हा डावखुरा ऑफ-स्पिन गोलंदाज असून, त्याने याच वर्षी अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 2 वनडे सामन्यांत 4 विकेट्स घेतल्या आहेत.

जेव्हा भारतीय संघ (Indian cricket team) 19 जुलै रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर उतरेल, तेव्हा त्यांना मागील 22 वर्षांपासून सुरू असलेला पराभवाचा दुष्काळ संपवायचा असेल. भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर वनडे सामन्यात शेवटचा विजय 2004 साली मिळवला होता. या सामन्यात रोहित शर्माकडून (Rohit Sharma) चांगल्या खेळीची अपेक्षा असेल, कारण गेल्या 8 वनडे डावांमध्ये त्याने फक्त एकदाच अर्धशतक ठोकले आहे.

दुसरीकडे, विराट कोहलीकडे (Virat Kohli) इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा जागतिक विक्रम बरोबरीने करण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त एका अर्धशतकाची गरज आहे. विराटने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 14 वेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तर कुमार संगाकाराने (Kumar Sangkara) 15 वेळा हा पराक्रम केला आहे.

भारतीय संघाचं अपडेटेड स्क्वाड: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिंस यादव आणि हर्ष दुबे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---