क्रिकेटला भारतात धर्म मानले जाते. तसेच भारतीय क्रिकेटजगतातील दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेटचा देव’ म्हटले जाते. त्याचे चाहते भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. परंतु त्याचा एक चाहता खूप खास आहे, जो सर्वांनाच चांगलाच परिचयाचा आहे. त्याचे नाव सुधीर कुमार आहे. सुधीर गेल्या कित्येक वर्षांपासून सचिनला समर्थन करत आहे. परंतु तो आता चक्क मास्टर ब्लास्टरचे मंदिर बांधायला निघाला आहे.
सुधीर कुमार लवकरच मुजफ्फरपूरमध्ये सचिन तेंडुलकरचे मंदिर बांधणार आहे. सध्या तो मंदिर बांधण्यासाठी पैशांचा बंदोबस्त करत आहे. मुख्य बाब म्हणजे तो या मंदिराचे उद्घाटन सचिन तेंडुलकरच्या हातून करणार आहे. (Sudhir kumar to build a temple for sachin tendulkar in muzaffarpur)
सुधीर कुमारने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “सचिन सरांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून ते माझ्यासाठी देव झाले आहेत. देवाला मंदिरात नाही ठेवणार तर कुठे ठेवणार? त्यामुळे मी मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सरांना पहिल्यांदा भेटल्यानंतर मी माझी नोकरी सोडून दिली होती. नेहमी मी क्रिकेटमध्ये गुंतलेलो असायचो. जिथे कुठे सचिन सरांचा सामना असायचा, मी तिथे हजेरी लावायचो. सचिन सर माझी सामना पाहण्याची व्यवस्था करायचे. माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तरीदेखील मी कधीच सचिन सरांकडून मदत घेण्याचा विचार केला नाही. मला अनेकदा भारतीय संघातील सदस्यांनी देखील मदतीसाठी हात पुढे केला, परंतु मी नकार दिला.”
२०२० नंतर सचिनशी भेट नाही
तसेच तो पुढे म्हणाला, “२०२० नंतर कोरोनामुळे माझी आणि सचिन सरांची भेट झाली नाही. परंतु आमचा संवाद सुरू असतो. ते माझी विचारपूस करत असतात. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. मलाही त्यांना समर्थन करण्यासाठी श्रीलंकेला जायचं आहे. परंतु कोरोनामुळे जाणं शक्य नाही. सचिन सरांनी म्हटले आहे की, जर कोरोनामुळे अडथळा निर्माण होत नसेल तर मी तिथे जाऊ शकेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
ख्रिस गेलनंतर ‘हा’ भारतीय असेल पुढील १४ हजारी मनसबदार, माजी क्रिकेटरचा दावा
स्म्रीतीचे अर्धशतक व्यर्थ, तिसऱ्या टी२०त इंग्लंडचा ८ विकेट्सने विजय; भारताने गमावली सलग चौथी मालिका
भारत, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड नव्हे तर ‘हा’ संघ पटकावेल टी२० विश्वचषक- दीप दासगुप्ता