टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. रविवारी (५ सप्टेंबर) स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी नोयडाचा जिल्हाधिकारी सुहास एल यथिराजने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. सुहासने बॅडमिंटनेमध्ये मध्ये पुरुष एसएल४ स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये सुवर्णपदकासाठी खूप संघर्ष केला. मात्र, तरीही फ्रान्सच्या एल माजुरने त्याला २१-१५, १७-२१, १५-२१ असे हरवले. त्यामुळे सुहासला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सुहासने या सामन्यात सुरुवातीला वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, शेवटच्या दोन सेटमध्ये तो मागे पडला. सुहासने सामन्याच्या दुसऱ्या सेटमधील त्याच्याहून जास्त अनुभव असलेला आणि विजेतेपदाचा प्रमुख दावेदार माजुर विरुद्ध चांगली सुरुवात केली होती. पण दुसऱ्या सेटच्या शेवटच्या काही क्षणांमध्ये तो मागे पडला.
माजुरने दुसऱ्या सेटमध्ये १७-२१ असा विजय मिळवत सामना १-१ अशा बरोबरीवर आणला. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या सेटमध्ये देखील सुहासने चांगली सुरुवात केली होती, एक वेळ अशी आली होती की, तो सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र, माजुरने अंतिम क्षणांमध्ये त्याचे चांगले प्रदर्शन दाखवत तिसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतली. अखेर तिसऱ्या सेटमध्ये सुहासला १५-२१ अशा फरकाने हार मानावी लागली आणि पॅरालिम्पिकमधील त्याचे सुवर्णपदक हुकले.
अंतिम सामन्याआधी उपांत्य सामन्यामध्ये सुहासने डोनेशियाचा फ्रेडी सेतियावानला २-० अशा फरकाने हरवले होते. त्याने पहिला सेट २१-९ ने त्याच्या नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये सेतियावानने चांगली टक्कर दिली मात्र सुहासने दुसरा सेटही २१-१५ ने जिंकला आणि सेतिवानला पराभूत करून अंतिम सामन्यात स्थान मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिमानास्पद! बॅटमिंटनमध्ये कृष्णा नागरची ‘सोनेरी’ कामगिरी, भारताच्या नावावर ५ वे सुवर्णपदक
शिक्षकदिन! आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास
ऑस्ट्रेलियाचे घातक गोलंदाज शॉन टेट भारताच्या ‘या’ रणजी संघाला देणार प्रशिक्षण