भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागलने गुरुवारी(४ मार्च) अर्जेंटीना ओपनमध्ये सनसनाटी विजयाची नोंद केली. सुमितने जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या ख्रिस्टियानो गार्टेनला पराभवाचा धक्का दिला. यासह आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विजयाचीही नोंद केली.
अर्जेंटीना ओपनच्या दुसर्या फेरीत खेळताना सुमितने हा पराक्रम केला. दुसर्या फेरीच्या सामन्यात त्याने ख्रिस्टियानो गार्टेनला ६-४, ६-३ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केले. संपूर्ण सामन्यात सुमितने वर्चस्व गाजवले.
जागतिक क्रमवारीत पहिल्या ५० क्रमांकांमध्ये असलेल्या खेळाडूंवर मिळवलेला सुमित नागलचा हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी त्याने यूएस ओपनमध्ये रॉजर फेडरर आणि डॉमिनिक थीमसारख्या खेळाडूंचा सामना केला होता. फेडररविरुद्ध त्याने पहिला सेट जिंकला देखील होता. मात्र सामना जिंकण्यात त्याला यश आले नव्हते.
मात्र आता अर्जेंटीना ओपनमधील ख्रिस्टियानो गार्टेनवर मिळालेल्या विजयाने त्याने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याची लढत आता अल्बर्ट रामोस व्हिनोलासशी होईल.
Nagal lo hizo 😳
El No.150 @nagalsumit da la sorpresa del día en el @ArgentinaOpen tras vencer a preclasificado No.2 🇨🇱Cristian Garin 6-4 6-3
🎥: @TennisTV pic.twitter.com/34UAWRcZzA
— ATP Tour en Español (@ATPTour_ES) March 4, 2021
यापुर्वी जेव्हा ग्रँडस्लॅम स्पर्धांवर नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, राफेल नदाल यासारख्या खेळाडूंचच अधिक वर्चस्व असतं, याबाबत विचारले असता सुमित म्हणाला होता, “टेनिस सारख्या खेळात काहीही घडू शकतं. पण हे दिग्गज खेळाडू जे करतात, त्याची बरोबरी करणे अशक्य आहे. फेडरर विरुद्ध खेळतांना त्याचा दर्जा किती श्रेष्ठ आहे हे माझ्या लक्षात आले. थीम विरुद्ध खेळतांना मी बरेच काही शिकलो. त्याची सर्विस अतिशय उत्तम आहे.”
सुमित नागलने आपल्या युवा कारकिर्दीत अनेकांना प्रभावित केले आहे. अर्जेंटीना ओपनमध्ये देखील त्याने गुरुवारी नोंदवलेल्या विजयाने भारतीय टेनिस चाहत्यांच्या त्याच्याकडूनच्या अपेक्षा नक्कीच उंचावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
कौतुकास्पद! षटकाराने तुटलेल्या खुर्चीवर मॅक्सवेलने केली सही, समाज कार्यासाठी होणार दान
मैदानात उतरताच विराटची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी; रुटच्याही नावावर खास विक्रमाची नोंद