तब्बल एक महिन्यांच्या चर्चा व जगभरातून येत असलेल्या दबामुळे टोकियो ऑलिंपिक्स एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. जुलै महिन्यात ही मानाची स्पर्धा जपानमधील टोकियो शहरात होणार होती.
जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्याशी चर्चेअंती यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसला साथीचा रोग घोषीत केल्यापासून ही स्पर्धा खेळवणे अवघड झाले होते. अनेक देशांनी या स्पर्धेतून यापुर्वीच माघार घ्यायला सुरुवात केली होती. कॅनडा यातून माघार घेणारा पहिला देश होता. तर काही देशांनी ऑलिंपिक्स एक वर्ष पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
आतापर्यंत तब्बल १६ हजारपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला असून ६ खंडातील ४ लाख नागरिक बाधीत झाले आहेत.
२०२१च्या उन्हाळ्यात ही स्पर्धा घेण्यात येणार असून ऑलिंपिक्स ही जगातील खेळाची सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा अनेक स्पर्धांवर परिणाम होणार असला तरी खेळाडू, आयोजक व आरोग्याशी निगडीत संस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
जपानने गेल्या ७ वर्षांत या स्पर्धेसाठी जवळपास १० बिलीयन डाॅलर रुपये खर्च केले आहेत. २०१३मध्ये जपानने इंस्तांबूल व माद्रिदला मागे टाकत यजमानपद मिळवले होते.
सध्याच्या टाॅप घडामोडी-
–शमीला चाहते सध्या गद्दार का म्हणताय? काय आहे कारण?
–मंबई किनारी पाहिला डाॅल्फिन मासा, रोहित केले त्याचे खास स्वागत
–घर फिरले की घराचे वासेही फिरतात, डेल स्टेनवर आली सर्वात मोठी वाईट वेळ