---Advertisement---

सलामीच्या स्थानासाठी ‘या’ खेळाडूंना द्यावी पसंती, गावसकरांचा भारताला सल्ला

On: सोमवार, मार्च 22, 2021 6:43 PM
Virat Kohli and Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानची टी२० मालिका भारतीय संघाने आपल्या नावे केली. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने पिछाडीवरून ३-२ असा विजय मिळवला. मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांनी सलामी दिली. त्यानंतर, भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी टी२० क्रिकेटमध्ये भारताचे सलामीवीर कोण असावे? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे ‌

भारतीय संघाने वापरल्या विविध सलामी जोड्या
भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेत वेगवेगळ्या सलामी जोड्या वापरल्या. पहिल्या सामन्यात शिखर धवन व केएल राहुल, दुसऱ्या सामन्यात राहुलसोबत इशान किशन सलामीला उतरला. तिसऱ्या व चौथ्या सामन्यात उपकर्णधार रोहित शर्माने राहुलसह डावाची सुरुवात केली.

मालिकेतील निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्माने सलामी दिली. या जोडीने ९ षटकात ९४ धावा जोडून भारताच्या विजयाची पायाभरणी केली. रोहितने ३४ चेंडूत ६४ तर, विराटने ५२ चेंडूत ८० धावांची खेळी केली. विराट आणि रोहितने कारकिर्दीत प्रथमच एकत्रितरीत्या टी२० सामन्यात सलामी दिली होती.

सुनील गावसकर यांनी सुचवली सलामीवीरांची नावे
भारतीय संघाचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय संघासाठी कोणी नियमितपणे सलामी द्यावी. या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. गावसकर यांनी म्हटले, “मला वाटते भारतीय संघासाठी टी२० सामन्यांमध्ये रोहित शर्मा व विराट कोहली यांनीच सलामी द्यावी. कारण, संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांनीच अधिकाधिक चेंडू खेळावेत. सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी सलामीला येण्यास सुरुवात केल्यापासून संघाच्या व त्याच्या कामगिरीमध्ये कमालीचा फरक जाणवला होता. विराट जागतिक दर्जाचा फलंदाज आहे व तो अधिकाधिक मैदानावर राहिल्यास संघाची धावसंख्या मोठी होईल.”

नियमित सलामीवीर केएल राहुल सलग चार सामन्यात अपयशी ठरल्यानंतर, विराट कोहलीने सलामीवीर म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरल्याचे देखील सिद्ध झाले होते. त्यामुळे आता गावसकर यांच्या सल्ल्यानुसार हीच सलामीची जोडी कायम ठेवण्यात येईल का, हे पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या:

भारत आणि मुंबई इंडियन्स संघात सामना झाला तर कोण जिंकणार? आकाश चोप्राने दिले उत्तर

एक शतक आणि विराटच्या निशाण्यावर तीन दिग्गजांचे विक्रम

अद्वितीय! युवराजच्या कारकिर्दीला लाभली सोनेरी किनार, उंचावली आणखी एक ट्रॉफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---