जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या या कृतीमुळे वाद झाला होता. खरं तर, सिराजने ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह स्मिथ याच्या दिशेने रागाच्या भरात चेंडू फेकला होता. हे सर्व तेव्हा घडले, जेव्हा तो चेंडू फेकण्यासाठी क्रीजपर्यंत पोहोचला, पण तेव्हाच स्मिथ अचानक यष्टीसमोरून बाजूला हटला. यावेळी गोंधळलेल्या सिराजने चेंडू स्मिथच्या दिशेने चेंडू फेकला होता. त्यानंतर स्मिथने स्पायडर कॅमेऱ्यामुळे असे केल्याचे सांगितले होते. सिराजच्या या कृतीमुळे भारतीय दिग्गज रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, आपले मतही मांडले.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी समालोचनादरम्यान म्हटले होते की, “हे काय सुरू आहे? हा दिवसाच्या खेळातील दुसरा आणि तिसरा चेंडू होता. यावर गोलंदाजाची अशी रिऍक्शन समजण्यापलीकडची आहे.” रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, “जर फलंदाजच तयार नव्हता, तर हटण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला वाटते की, स्मिथने त्याच्या या षटकाची सुरुवातीला जे दोन चौकार मारले होते, हे त्याच्या वैतागण्यापलीकडे काही नव्हते.”
‘मी स्वत: निराश होतो’
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेव्हा या विषयीवर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला प्रश्न विचारला गेला. यावेळी त्याने यामागील विचित्र उत्तर दिले. तो म्हणाला की, “वादासारखे काहीच नव्हते. ही फक्त जरा मजा होती. जर तुम्ही खेळाचा आनंद घ्याल, तेव्हा तुमचे डोके शांत राहील. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त दबाव घेतला, तर याचा परिणाम तुमच्या गोलंदाजीवर होईल.”
.Mohammad Siraj said, “it was nothing, I was just enjoying. It is important to do that as it is a long day. (on throwing back the ball to Smith) pic.twitter.com/UYygo9i6Xz
— .???????????????????? ???????????????????????????? (@impeter_00) June 9, 2023
स्मिथला त्रास देण्याच्या योजनेचा भाग होता का? असे विचारले असता तो म्हणाला की, “असे काहीच नव्हते. त्याला निराश करण्याची कोणतीच योजना नव्हती. मी तर स्वत: निराश होतो, त्यामुळे गोलंदाजीची मजा घेण्यासाठी असे केले.”
स्मिथने झळकावलेल्या 121 धावा
स्टीव्ह स्मिथ याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 121 धावा केल्या. या धावा त्याने 268 चेंडूंचा सामना करताना केल्या. यामध्ये 19 चौकाारंचा समावेश होता. स्मिथच्या (121) आणि ट्रेविस हेड (163) यांच्यात 285 धावांची भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. (sunil gavaskar and ravi shastri slam mohammed siraj for steve smith ball throwing row during wtc final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अजिंक्य रहाणेचे जबरदस्त कमबॅक! 69 धावा करताच बनला ‘असा’ भीमपराक्रम करणारा 13वा भारतीय
मानलं रे! 18 महिन्यांनी कमबॅक करत रहाणेने रचला इतिहास, WTC Finalमध्ये फिफ्टी झळकावणारा पहिलाच इंडियन