क्रिस्टीच्या ऑनलाइन लिलावाची मंगळवार पासून (२७ ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. या लिलावात माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांची १९७१ सालच्या इंग्लंड दौऱ्यावर घातलेली टोपी लिलावासाठी ठेवण्यात आली आहे. तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कोचिंग किटचीही बोली लागण्याची शक्यता आहे.
क्रिस्टीच्या या ऑनलाइन लिलावात सर ज्योफ्री बॉयकॉट यांचा वस्तू संग्रह व टी२० चॅरिटी क्रिकेटशी संबंधित वस्तुंचाही समावेश आहे. २७ ऑक्टोबरपासून सुरु झालेला हा लिलाव १६ नोव्हेंबर रोजी संपेल.
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू सर ज्योफ्री बॉयकॉट यांच्या संग्रहात अनेक अविस्मरणीय वस्तुंचा समावेश आहे. गावसकरांची इंग्लंड दौऱ्यावरील ती टोपीही बॉयकॉट यांच्या संग्रहाचा भाग आहे. याचबरोबर संग्रहात एक बॅट आहे, जिने बॉयकॉट यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांचे १००वे शतक लगावले होते. या बॅटला ३० ते ५० हजार पाँड (भारतीय रुपये- २८.९५ ते ४८.२५ लाख) मिळण्याची शक्यता आहे.
या लिलावात माजी वेस्ट इंडिज अष्टपैलू मायकल होल्डिंगच्या एका शर्टचाही समावेश आहे. १४ मार्च १९८१ रोजी हा शर्ट घालून त्यांनी ब्रिजटाउन येथे झालेल्या सामन्यात बॉयकॉट यांना शून्यावर बाद केले होते. त्या शर्टवर होल्डिंग यांचे हस्ताक्षर देखील आहेत. तर क्रिस्टीच्या दूसऱ्या लिलावात टी२० चॅरिटी क्रिकेटशी जुडलेल्या कित्येक अविस्मरणीय वस्तू सामील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हा तूझा शेवटचा सामना आहे का? प्रश्नावर धोनीने दिले ‘हे’ उत्तर
क्रिकेटपटूंचे विक्रम अनेक पाहिले, आता ‘या’ अंपायरनेचे केलाय मोठा कारनामा
जोडी नंबर वन! तब्बल ९४ वर्षांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या जोडीने मोडला ‘हा’ मोठा विक्रम
ट्रेंडिंग लेख-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’