---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७४ धावा करणाऱ्या अय्यरचे चाहते बनले गावसकर; जोकोविच, फेडररशी केली तुलना

On: रविवार, फेब्रुवारी 27, 2022 6:21 PM
Shreyas-Iyer
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध मायदेशात ३ सामन्यांची टी२० मालिका (3 Matches T20I Series) खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशाला येथे झालेला दुसरा टी२० सामना (Second T20I Match) ७ विकेट्सने जिंकत भारतीय संघाने ही आघाडी घेतली होती. संघाला ही विजयी आघाडी मिळवून देण्यात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना ताबडतोब अर्धशतकी खेळी करत १८ व्या षटकातच संघाचा विजय निश्चित केला.

याच श्रेयसचे भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कौतुक केले आहे. त्यांनी श्रेयसची तुलना टेनिस स्टार नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरेरच्या फोरहँड (Gavaskar Compared Shreyas Iyer With Djokovic & Federer) शॉटशी केली आहे.

श्रीलंकेच्या १८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसोबत मिळून ८० पेक्षा जास्त धावांची भागिदारीही केली होती. तसेच वैयक्तिक नाबाद ७४ धावा केल्या होत्या. ४४ चेंडू खेळताना ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली होती.

https://twitter.com/BCCI/status/1497624083869040641?s=20&t=XSwFRd4teDHl6tOm9HbaDg

त्याच्या या शानदार खेळीबाबत स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले की, “हेच तर या विशेष भारतीय संघाचे सौंदर्य आहे. भारतीय संघाकडे प्रत्येक स्थानासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या कोणालाही संधी मिळते, त्या प्रत्येकाला हे माहिती असते या स्थानावर ताबा मिळवण्याची गरज आहे आणि ही संधी वाया नाही जाऊ दिली पाहिजे. श्रेयसने या डावामध्ये कमालीचा खेळ दाखवला आहे. यातून त्याच्या फलंदाजीतील चातुर्य स्पष्ट दिसते. तो ज्या प्रकारचे शॉट खेळत होता, त्यावरून त्याला त्याच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास असल्याचे जाणवते.”

तसेच पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “फलंदाजीला आल्यानंतर बॅटने त्याने सर्वप्रथम स्ट्रेट ड्राईव्ह मारत चौकार ठोकला. यानंतर त्याने समोरच्या बाजूला हवेत चेंडू मारला होता, ज्यावर त्याने झेलबाद होण्याच्या शक्यता फार कमी होत्या. कारण क्षेत्ररक्षख साइड स्क्रिनच्या पुढे उभे नव्हते. खरे तर फलंदाजाने जितके शक्य होतील, तितके सरळ चेंडूला हिट केले पाहिजे. अशावेळी जरी चेंडू हालला तरी तो बॅटची कडा घे इकडे-तिकडे जातो. श्रेयस त्याला जितके शक्य होईल, तितका सरळ बॅटने शॉट मारत होता. हे अविश्वसनीय होते. त्याचे शॉट जोकोविच वा रोजर फेडररच्या फोरहँड शॉटसारखे भासत होते.”

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल सुरू होण्यापूर्वी ब्रॉडकास्टर्स खुश, तब्बल ‘एवढ्या’ लाख लोकांनी पाहिला मेगा लिलाव

टीम इंडियाला धक्का! फॉर्ममध्ये असलेला फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२०तून बाहेर

कॉफी घेणार का? हिमाचलच्या थंडीची सामन्यादरम्यान कर्णधार रोहित लुटतोय मजा, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---