पुढच्या महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौरा करणार आहे. याठिकाणी भारताला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. कसोटी आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी (24 जून) संघ घोषित केला. अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याला मात्र संघातून वगळण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर निवड प्रक्रियेवर नाराज दिसले.
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 209 धावांनी पराभूत झाला. या सामन्यात अजिंक्य रहाणे वगळता भारतीय संघाचे जवळपास सर्व फलंदाज अपयसी ठरले. चेतेश्वर पुजारा () नुकतेच काउंटी क्रिकेट खेळून आला होता आणि डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र, पुजारा देखील इतर फलंदाजांप्रमाणे मोठी खेळी करू शकला नाही. भारतासाठी एकटा पजुरा या सामन्यात अपयशी ठरला असे नाही. पण निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने मात्र पराभवासाठी पुजाराला कारणीभूत धरल्याचे दिसते.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी दौऱ्यायसाठी भारताने जो कसोटी संघ घोषित केला, त्यात चेतेश्वर पुजाराचे नाव नव्हते. हेच पाहून भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली. “होय, तो काउंटी क्रिकेट खेळत आहे. त्याने रेड बॉल क्रिकेट खूप खेळले आहे, त्यामुळे पुनरागमन कसे करायचे हेदेखील त्याला चांगलेच माहिती आहे. इतर खेळाडू 40-39 वर्ष वय असतानाही खेलत आहेत. यात काहीच चुकीचं नाहीये. कारण ते सर्वजण खूप फिट आहेत. जोपर्यंत तुम्ही धावा करताय आणि विकेट्स घेताय, तोपर्यंत संघातून बाहेर काढण्यायचे कुठलेच कारण मलातरी वाटत नाही.”
“स्वष्ट आहे की, केवळ एकाच खेळाडूला संघातून बाहेर केले आहे. पण अपयश तर इतरांनाही आले होते. माझ्या मते आले फलंदाज अपयशी ठरले होते. अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीच धावा केल्या नाहीत. अशात एकट्या पुजारालाच संघातून का काढले. फलंदाजी क्रमाच्या अपयशासाठी त्याला बळीचा बकरा का बनवले जात आहे? तो भारतीय संघाचा एक प्रामाणिक सेवक आहे. यामागचे कारण हेच आहे की, कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे लाखो फॉलोअर्स नाहीत, जे त्याला संघातून काढल्यानंतर गोंधळ घालतील,” असेही गावसकर पुढे म्हणाला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या बड्या खेळाडूंवरही निशाणा साधला. (Sunil Gavaskar expresses displeasure over Cheteshwar Pujara not being picked for Test series against West Indies)
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
महत्वाच्या बातम्या –
लीग स्टेजच्या शेवटच्या दिवशी भिडणार प्लेऑफचे चारही संघ, ठरणार MPL 2023च्या क्वॉलिफायर-एलिमिनेटरचं गणित
MPL 2023: सीएसकेची विजयी अखेर! सोलापूरच्या पराभवासह पुणेरी बाप्पा प्ले ऑफमध्ये