शनिवारी(19 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगने त्याचा 46 वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे याच दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय देखील मिळवत पाँटिंगला खास भेट दिली. याबरोबरच पाँटिंगला त्याच्या वाढदिवसाची आणखी एक खास भेट मिळाली, ती भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्याकडून.
गावसकर आणि पाँटिंग यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी दरम्यान एकत्र समालोचन केले होते. याच दरम्यान शनिवारी गावसकरांनी पाँटिंगला ‘सनी ग्रीन’ कॅप भेट दिली. हिरव्या रंगाची असलेल्या या टोपीवर (कॅप) गावसकरांच्या कव्हर ड्राईव्हचा लोगो आणि स्वाक्षरी आहे.
ही टोपी पाँटिंगला भेट देण्याबद्दल मिररने दिलेल्या वृत्तानुसार गावसकरांनी सांगितले की ‘त्याला सनी ग्रीन कॅप दिली, त्याच्याकडे त्याची बॅगी ग्रीन (ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाची टोपी) आधीपासूनच आहे.’
तसेच गावसकरांचा मुलगा रोहन गावसकर याने सुनील गावसकर पाँटिंगला टोपी भेट देत असतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच त्याने लिहिले आहे की ‘रिकी पाँटिंगला त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘सनी ग्रीन’ भेट देण्यात आली. दिग्गज क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!’
Ricky ponting being presented with the sunny green on his birthday 🙂 happy birthday legend !! #champions pic.twitter.com/JA1aQ9goBA
— Rohan Gavaskar (@rohangava9) December 19, 2020
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याआधी देखील पाँटिंगने गावसकरांबरोबर समालोचन करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.
त्याने गावसकरांबरोबरचा फोटो ट्विटरवर शेअर करत करत म्हटले होते की ‘या व्यक्तीबरोबर पहिल्यांदाच समालोचन करण्यास उत्सुक आहे. तसेच 10 महिन्यांनंतर चाहत्यांना मैदानावर पाहून रोमांचकारी वाटत आहे. मला वाटते ऑस्ट्रेलिया ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकेल.’
Can't wait to commentate alongside this man for the first time, and excited to be back at a ground with fans for the first time in 10 months. Predicting 2-1 Australia. #AUSvIND pic.twitter.com/UV5WEgi7LD
— Ricky Ponting AO (@RickyPonting) December 17, 2020
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित 3 सामन्यात देखील सुनील गावसकर समालोचन करताना दिसणार आहेत. या मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘नवरा दुखापतीने त्रस्त, बायको दुसऱ्या क्रिकेटपटूसोबत पार्टी करण्यात व्यस्त’
‘प्रिय अजिंक्य…’ दुसऱ्या कसोटीपूर्वी वसीम जाफरचा रहाणेसाठी ‘सिक्रेट मेसेज’
‘गब्बर जहा खडा होता है, लाईन वही से शुरू होती है’, धवनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल