भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पण या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने वर्चस्व गाजवले. भारताचे दोन्ही सलामीवीर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिले. यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) नाबाद 90 धावांची खेळी केली, तर केएल राहुलने (KL Rahul) 62 नाबाद धावांची खेळी केली.
यशस्वी जयस्वालने पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकूटाची तसेच अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लायनची निराशा केली. भारताच्या या सलामी जोडीने 172 धावांची अखंड भागीदारी करून भारताला 218 धावांची आघाडी मिळवून दिली. महान खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हणाले, “हा मुलगा खास आहे. जिथून कुठून आला आहे, ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत आहे आणि प्रसिद्धी सांभाळत आहे, ते सोपे नाही.”
सुनिल गावसकर म्हणाले, “इंग्लंडविरूद्धच्या 5 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 700 हून अधिक धावा केल्या, त्यापैकी त्याने या वर्षाच्या सुरुवातीला 2 द्विशतके झळकावली आणि तो धावांसाठी खूप भुकेलेला दिसतो जो तुम्हाला फलंदाज म्हणून हवा आहे.”
गावस्कर यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’ला सांगितले की, “आमच्यापैकी देखील अनेकांना शतक झळकावण्यास सांगितले होते. मला वाटते की, तो म्हणतो की मला 150 किंवा 200 धावा करायच्या आहेत. तो धावांचा भुकेला आहे आणि भारतीय क्रिकेटला नेमकी हीच गरज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पांड्याने धमाकेदार अर्धशतक झळकावत संघाला मिळवून दिला शानदार विजय!
जयस्वाल-राहुलच्या शानदार खेळीनंतर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “आज खेळपट्टी खूप…”
तिलक वर्माने झंझावाती शतक झळकावून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू!